‘मोदींनी गरीबांना एक रुपयाचीही कर्जमाफी दिली नाही’; राहुल गांधींचा घणाघात

‘मोदींनी गरीबांना एक रुपयाचीही कर्जमाफी दिली नाही’; राहुल गांधींचा घणाघात

Rahul Gandhi Criticized PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील युवकांना प्रचंड त्रास दिला.  मागील 45 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी सध्या देशात आहे. मोदींनी फक्त 22 अब्जाधीशांना मदत केली. देशातील गरीबांचं एक रुपयाचंही कर्ज माफ केलं नाही, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी आज अमरावती मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली.  या सभेत त्यांनी केंद्र सरकार भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

तुम्ही अब्जाधीश बनवा आम्ही लखपती बनवू

राहुल गांधी पुढे म्हणाले,  मोदींनी देशातील 22 ते  25 लोकांना 25 वर्षांचा मनरेगाचा पैसा देऊन टाकला आणि म्हणतात की आम्ही गरीबांचं सरकार चालवतो. त्यांच्या सरकारने देशात अब्जाधीश तयार केले पण आम्ही लखपती तयार करणार आहोत. हे कसं होणार तर सांगतो. आधी पक्षाचा जाहीरनामा वाचा. देशात जर इंडिया आघाडीचं सरकार आलं तर हे सरकार गरीबांची यादी करणार. भारतात करोडो लोक दारिद्र्यरेषेखाली राहतात. या गरीब कुटुंबातील एका महिलेचं नाव घेणार. या महिलेच्या बँक खात्यात प्रत्येक वर्षात एक लाख रुपये म्हणजे दर महिन्याला 8 हजार 500 रुपये टाकणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

आगामी काळात आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांचं मानधन दुप्पट करणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मोदींनी युवकांना प्रचंड त्रास दिला. सर्वाधिक बेरोजगारी आज भारतात आहे. युवक रोजगाराच्या शोधात भटकत आहे. या समस्येतून मार्ग काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. देशातील गरीब आणि बेरोजगार युवकांना अप्रेंटिसशीप अधिकार देणार. सर्व क्षेत्रात एक वर्षाची अप्रेंटीसशीप देणार. या युवकांना एका वर्षाची नोकरी मिळणार तसेच बँक खात्यात वर्षाला एक लाख रुपये जमा करणार असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी यावेळी केली.

राहुल गांधी म्हणाले…

शेतकऱ्यांसाठी एक आयोग स्थापन करणार.

हा आयोग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काम करणार.

कर्जमाफीची गरज असेल तेव्हा आयोग अहवाल देणार.

आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार.

अंगणवाडी सेविकांचं मानधन दुप्पट करणार.

सरकारी नोकरी आणि खासगी क्षेत्रात महिलांना 50 टक्के आरक्षण देणार

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube