Vikas Bansode Beaten Up In Love Affair Died In Beed : बीडमध्ये (Beed Crime)रोज गुन्हेगारीच्या नव्या घटना समोर येत आहेत. आष्टी तालुक्यात एका 25 वर्षाच्या तरूणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजीच आहे. अशातच पुन्हा एक धक्कादायक प्रकरण समोर (Beed News) आलंय. ही घटना बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये घडली आहे. ट्रकमालकाने चालकाला डांबून ठेवलं, अतिशय क्रूरपणे मारहाण केलीय. या मारहाणीत तरूणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.
पिंपरी घुमरी येथे ट्रकमालकाने ट्रकचालकाला दोन दिवस डांबून ठेवलं. या काळात चालकाला सतत मारहाण केली. शेवटी या मारहाणीत तरूणाने (Vikas Bansode) शेवटचा श्वास घेतला. त्याला अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती. या घटनेत ट्रकचालकाचं संपूर्ण अंग काळं निळं पडलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. ही घटना भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी तालुक्यात घडली आहे.
न्यायालयाच्या निकालावर संशय म्हणजे मूर्खपणा…माणिकराव कोकाटे संतापले, विरोधकांकडून राजकीय षडयंत्र
जालन्याचा विकास बनसोडे हा पिंपरी घुमरीतील क्षीरसागर यांच्या ट्रकवर चालक म्हणून काम करायचा. गेल्या चार वर्षांपासून तो क्षीरसागर यांच्याकडे काम करीत होता. परंतु त्याचं क्षीरसागर यांच्या मुलीसोबत प्रेमप्रकरण (Love Affair) असल्याचं सांगितलं जातंय. ज्या दिवशी घटना घडली, त्या दिवशी विकास आणि क्षीरसागर यांची मुलगी घराच्या मागील बाजूस असलेल्या शेतात होती. त्यांना एकत्र पाहून क्षीरसागर संतापले अन् त्यांनी विकासला डांबून ठेवत जबर मारहाण केली. त्याच्या शरीरावर सगळीकडे काळे निळे व्रण दिसत आहेत.
पुन्हा स्व संतोष देशमुखांसारखीच घटना ?
ही माणसं आहेत की जनावरं?
आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) विकास बनसोडे या युवकाचा खून
आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब शिरसागर यांच्याकडे विकास बनसोडे वय वर्ष 25 , हा जालना तालुक्यातील युवक ट्रक ड्राइवर म्हणून, गेले ४ वर्ष… pic.twitter.com/FxRgNk6Y72
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) March 16, 2025
विकास आणि क्षीरसागर यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादानंतर क्षीरसागर यांनी विकासला डांबून ठेवत मारहाण केली, असा आरोप विकासचा भाऊ आकाशने केलाय.हा प्रकार समोर आल्यानंतर भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासच्या घरी फोन करत त्यांना तातडीने बीडला येण्यास सांगितलं. विकासची आई मारहाण करू नका, अशी विनंती करत होती. परंतु बनसोडे कुटुंब जेव्हा बीडला पोहोचलं, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. विकासचा मृतदेह रूग्णालयातच असल्याची माहिती मिळतेय.
मोठी बातमी! पाकिस्तान सैन्याच्या 8 बसेसवर BLA चा मोठा हल्ला; तब्बल 90 सैनिक ठार
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सोशल मिडिया पोस्ट केलीय, त्यांनी म्हटलंय की पुन्हा स्व संतोष देशमुखांसारखीच घटना? ही माणसं आहेत की जनावरं? आष्टी तालुक्यातील पिंपरी (घुमरी) विकास बनसोडे या युवकाचा खून. आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब शिरसागर यांच्याकडे विकास बनसोडे वय वर्ष 25, हा जालना तालुक्यातील युवक ट्रक ड्राइवर म्हणून, गेले 4 वर्ष कामाला होता. या युवकाचा जागीच मृत्यू झाला, मृत्यू झाल्याचे कळताच कडा चौकीला कळवण्यात आले. एक आरोपीला अटक झाली असे सांगण्यात आले. कधी थांबणार हे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.