Beed News : आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण; भाजप आमदाराच्या पत्नीवर गुन्हा दाखल
Beed News : बीड जिल्ह्यात एका आदिवासी महिलेचा विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरून पळत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह आणखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार आरोपींनी महिलेला मारहाण केली. आरोपींनी महिलेचे कपडे फाडले. महिलेने विरोध केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे आता सांगण्यात येत आहे. पीडितीने आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह आणखी तिघांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार या प्रकरणी आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांच्या पत्नीला गुंडांच्या मदतीने आपली जमीन बळकावयाची आहे असा आरोप या पीडित महिलेने केला आहे. त्यांच्याकडून ज्या जमिनीवर दावा केला जात आहे ती जमीन आपल्या कुटुंबाकडे मागील 60 ते 70 वर्षांपासून आहे असा दावा महिलेने केला आहे. दोन दिवसांपू्र्वी याच वादातून या ठिकाणी वाद झाले होते. संबंधित जागेचा वाद सोडविण्यासाठी भाजपा आमदार सुरेश धस यांच्या पत्नी त्या ठिकाणी गेल्या होत्या. तरी देखील वाद काही मिटला नाही उलट जास्तच वाढला. या पीडित महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्याशी संपर्क साधला असता बदनामी करण्याच्या उद्देशाने आणि राजकीय सूडापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व प्रकरण खोटे आहे. याबाबत लवकरच सविस्तर बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Winter Session : ऐन गुलाबी थंडीत वाढणार नागपूरचे तापमान; हिवाळी अधिवेशनाची तारिख जाहीर