Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Investigation : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात मोठी अपडेट आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आलीय. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली ( यांच्या नेतृत्त्वात SIT काम करणार (Beed News) आहे. यात 9 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असेल. आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलाय. याप्रकरणात खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर देखील निशाणा साधला जातोय. कालच त्याने सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलंय. वाल्मिक कराडला न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या तपास प्रकरणाला वेग प्राप्त झालाय. या घटनेतील फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य शासनाने एसआयटी स्थापन केलीय. आयपीएस अधिकारी बसवराज तेली (IPS Basavaraj Teli) यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आलीय.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 4 भाविकांवर काळाची झडप, सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात
या घटनेचा तेली यांच्यासह 10 जणांची टीम सखोल तपास करणार आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने विशेष तपास पथक स्थापन (Beed Crime News) केलंय. या पथकात पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची नियुक्ती करण्याची बाब शासन विचाराधीन होती, त्यानुसार ही एसआयटी गठित करण्यात आल्याचं गृह विभागाने परिपत्रकात म्हटलंय.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पुणे सीआयडी पोलीस उपमहानिरीक्षक आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली आर्थिक गुन्हे शाखा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलंय. तसंच बसवराज तेली यांनी शासनाकडे मागणी केल्यानुसार या विशेष तपास पथकामध्ये खालील काही अधिकारी आणि अंमलदार यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra Govt forms Special Investigation Team (SIT) to probe murder of Beed village sarpanch Santosh Deshmukh: Official. pic.twitter.com/LGYrtJcsc7
— Press Trust of India (@PTI_News) January 1, 2025
बसवराज तेली कोण आहेत?
बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाची जबाबदारी सीआयडी पोलीस उपमहानिरीक्षक आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्यावर सोपविण्यात आलीय. ते 2010 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते मूळचे बेळगाव जिल्ह्यातील खंदीबुद गावचे आहेत. त्यांनी नागपूर शहर पोलीस उपायुक्त, औरंगाबाद येथे अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे येथे शहर उपायुक्त आणि सांगलीचे पोलीस अधीक्षकपद सांभाळलेले आहे.