Chandrashekhar Bawankule Criticized Uddhav Thackeray : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar Bawankule) शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर केलेल्या टीकेवरून बावनकुळेंनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवर एक पोस्ट करत, ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मोठी दुर्घटना: पुण्यात कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या पिकअपचा अपघात, अनेक भाविक महिला जखमी
कोण ‘ थिफ मिनिस्टर‘?
पोस्टमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय की, उद्धव ठाकरे जी, खंडणीखोरांचा सरदार कोण आहे? हे जनतेला माहिती आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत कोण ‘चिफ मिनिस्टर‘ आहे? आणि कोण ‘ थिफ मिनिस्टर‘ हे देखील महाराष्ट्रातील जनतेनं दाखवून दिलं आहे. वाझे काय लादेन आहे का? असे म्हणत उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटी वसुली सुरू होती हे जनता विसरली नाही. त्यामुळे आदरणीय देवेंद्रजींवर टीका करताना जरा आपला भूतकाळ आठवा आणि विचार करून बोला, असं देखील बावनकुळे यांनी विचारलं आहे.
उद्धव ठाकरे जी,
खंडणीखोरांचं सरदार कोण आहे? हे जनतेला माहिती आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत कोण ‘चिफ मिनिस्टर‘ आहे? आणि कोण ‘थिफ मिनिस्टर‘ हे देखील महाराष्ट्रातील जनतेनं दाखवून दिलं आहे. वाझे काय लादेन आहे का? असे म्हणत उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या…— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 11, 2025
इंडीया आघाडीत किंमत
बाकी इंडीया आघाडीत तुमची शेवटच्या रांगेतील किंमत महाराष्ट्रानं बघितली. आजही आपल्याला शेवटच्या रांगेत उभं राहावं लागेल, म्हणून तुम्ही दिल्लीतील आंदोलनात गेला नाहीत. इथं चार टाळके घेऊन आंदोलन केलं. तिकडं राहुल गांधींचं आंदोलन सुरू असताना आपली वेगळी चूल मांडून तुम्ही लक्ष वेधण्याचा निष्फळ प्रयत्न केला, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
फैसलचे आरोप ‘हर्टफुल आणि दिशाभूल करणारे’! आमिर खानच्या कुटुंबाची प्रतिक्रिया
लोकशाहीचा आणि नैतिकतेचा गळा घोटला
उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना लोकशाहीचा आणि नैतिकतेचा गळा घोटला होता. आज देवेंद्रजींसारख्या प्रामाणिक नेतृत्वावर बोट ठेवण्याआधी तुम्ही स्वतःला आरशात पाहायला हवं. देवेंद्रजी फडणवीस यांचं काम हे फक्त भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचं नाही, तर स्थिर, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचं आहे. महाराष्ट्रातील जनतेचा देवेंद्रजींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला लोकं कंटाळले आहेत.