फैसलचे आरोप ‘हर्टफुल आणि दिशाभूल करणारे’! आमिर खानच्या कुटुंबाची प्रतिक्रिया

फैसलचे आरोप ‘हर्टफुल आणि दिशाभूल करणारे’! आमिर खानच्या कुटुंबाची प्रतिक्रिया

Aamir Khan Family Issue Statement Brother Faisal Khan Claim : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता फैजल खानने त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केल्यानंतर, आता आमिर खानच्या (Aamir Khan) कुटुंबाने अधिकृत निवेदन जारी करून हे दावे फेटाळून लावले आहेत. फैजलने आरोप केला होता की, त्याला एक वर्ष घरात कोंडून ठेवण्यात आले होते. त्याला स्किझोफ्रेनिया आहे असे सांगून बदनामी करण्यात आली (Faisal Khan Claim) होती. या प्रकरणात फैजलने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जबाबदार धरले होते. खान कुटुंबाने फैजलचे दावे फेटाळले आहेत. माध्यमांना आवाहन केले आहे की, त्यांच्या कुटुंबाच्या प्रकरणाचा वापर गॉसिप करू नये.

वसईतील भयानक सेक्स रॅकेट! तीन महिन्यांत 200 जणांनी लचके तोडले, 12 वर्षीय बांग्लादेशी मुलीची केली सुटका

कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फैसलच्या (Entertainment News) बोलण्याने त्यांना दुखावले आहे. त्याने घटनांचा विपर्यास करण्याची ही पहिलीच वेळ नाही. कुटुंबाने स्पष्ट केले की, फैसलशी संबंधित सर्व निर्णय डॉक्टर आणि मानसिक आरोग्य तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतरच घेतले गेले.

निवेदनात कुटुंबाने काय म्हटले?

खान कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फैसलने त्याची आई झीनत ताहिर हुसेन, बहीण निखत हेगडे आणि भाऊ आमिर (खान) यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. चुकीच्या पद्धतीने सादरीकरण केले आहे, याबद्दल आम्हाला दुःख आहे. त्याने घटनांचे चुकीचे वर्णन करण्याची ही पहिलीच वेळ नसल्यामुळे, आम्हाला वाटते की आपले हेतू स्पष्ट करणे आणि कुटुंब म्हणून आपली एकता पुन्हा सांगणे महत्वाचे आहे.

INDIA Alliance March : मोठी बातमी, राहुल गांधी – संजय राऊत दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय

खान कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनावर रीना दत्ता, जुनैद खान, आयरा खान, फरहत दत्ता, राजीव दत्ता, किरण राव, संतोष हेगडे, सहर हेगडे, मन्सूर खान, नुझहत खान, इम्रान खान, टीना फोन्सेका, जैन मेरी खान आणि पाब्लो खान यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांनी स्वाक्षरी केली आहे. कोणत्याही कटाची शक्यता नाकारताना, निवेदनात म्हटले आहे की, फैसलशी संबंधित प्रत्येक निर्णयात संपूर्ण कुटुंबाचे मत समाविष्ट आहे हे स्पष्ट करणे महत्वाचे आहे आणि हे निर्णय अनेक वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानंतरच घेण्यात आले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube