वसईतील भयानक सेक्स रॅकेट! तीन महिन्यांत 200 जणांनी लचके तोडले, 12 वर्षीय बांग्लादेशी मुलीची केली सुटका

Vasai Sex Racket 12 Year Old Girl Rescued : मुंबईतून ( सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने 26 जुलै रोजी मोठी (Vasai Sex Racket) कारवाई केली. वसईतील नायगाव येथे एनजीओच्या मदतीने देह व्यापार रॅकेटमधून एका 12 वर्षीय बांग्लादेशी मुलीची सुटका करण्यात (Mumbai Crime) आली आहे. दरम्यान, रेस्क्यू होताच पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिलीय.
INDIA Alliance March : मोठी बातमी, राहुल गांधी – संजय राऊत दिल्ली पोलिसांच्या ताब्यात
200 हून अधिक पुरुषांनी केले लैंगिक अत्याचार
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने आणि एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मोनी फाउंडेशन यांच्या मदतीने ही कारवाई केली. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात (Physical Abused) आलीय. पुढील तपास सुरू आहे. या अल्पवयीन पीडितेने एनजीओला दिलेल्या जबानीत भयंकर सत्य समोर आलंय. फक्त तीन महिन्यांत तिच्यावर 200 हून अधिक पुरुषांनी लैंगिक अत्याचार केलेत.
एका विषयात नापास झालेली मुलगी वसईपर्यंत कशी पोहोचली?
एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम कांबळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. पीडिता एक शाळकरी विद्यार्थीनी असून ती एका विषयात नापास झाली होती. आई-वडील ओरडतील या भीतीने तिने घर सोडलं. एका ओळखीच्या महिलेने तिला कलकत्त्यात आणलं. तिथे तिचे खोटे कागदपत्र तयार केले. त्यानंतर तिला गुजरातला आणलं गेलं. तिथं एका वृद्ध व्यक्तीने तिच्यावर अत्याचार करून अश्लील फोटो काढले. नंतर तिला ब्लॅकमेल करत देहव्यापारात ढकललं. पुढं तिला मुंबईत आणलं.
गाझात अल-जझीराचे 5 पत्रकार ठार! इस्रायलचा हल्ला, ‘हामासचे दहशतवादी’ म्हणून टार्गेट
देह व्यापारातील राक्षसांनी ओरबाडलं
मुंबईत तिच्यावर अनेक ठिकाणी अत्याचार करण्यात आले. अद्याप किशोरावस्थेत न पोहोचलेल्या या निरागस मुलीला देह व्यापारातील राक्षसांनी ओरबाडलं. तिचं बालपण हिरावून घेतलं. एन.जी.ओ. आणि पोलिसांनी रेस्क्यू केलं. त्यानंतर पीडित मुलीला उल्हासनगर येथील बाळ कल्याण सिमीतीच्या ताब्यात दिलं. तिथे तिच्यावर समुपदेशन करण्यात येतंय. याप्रकरणाचा सध्या तपास नायगाव पोलीस करत असून त्यांनी आतापर्यंत यात 9 आरोपींना अटक केलीय. यात दोन महिला अन् सात पुरुष दलाल आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करुन, त्यांच्यावर कठोर शिक्षा करण्याची मागणी एनजीओनी केलीय.