धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठींब्याने महिला वकीलच चालवतात सेक्सटॉर्शन रॅकेट?

female lawyers sextortion racket with support of police officers : राज्यात सध्या गुन्हेगारी घटनांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना तर वारंवार घडत आहेत. मात्र मुंबईमध्ये महिलांकडूनच पुरूषांची फसवणुक केली जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामध्ये थेट महिला वकीलांकडूनच सेक्सटॉर्शन रॅकेट चालवले जात असून त्यांना थेट पोलीस अधिकारीच पाठींब देत आहेत. असा दावा करण्यात आला आहे. काय आहे हे प्रकरण पाहुयात…
काय आहे हे प्रकरण?
नवी मुंबई, ठाणे परिसरामधील एक कार कंपनीचा वरिष्ठ अधिकारी महिला वकीलावरील अत्याचाराच्या गुन्हाखाली गेल्या कित्येक महिन्यांपासून जेलमध्ये आहे. त्याने नुकतीच एक याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्याने एक धक्कादायक दावा केला आहे. त्याच्या विरूद्ध गुन्हा नोंदवणारी महिला वकील ही एक सेक्सटॉर्शन रॅकेट चालवणारी सिरीअल तक्रारदार आहे. तीच्या सारख्या काही महिला वकीलांकडून अशाप्रकारे श्रीमंत पुरूषांना जाळ्यात ओढून त्यांच्याशी अगोदर संबंध ठेवले जातात. नंतर त्यांच्यावर अत्याचाराचे आरोप करून पैसे घेतले जातात. जर पैसे नाही दिले तर त्यांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते.
कमालच! वैज्ञानिक शोधलं नवं पाणी; ‘प्लास्टिक आइस’ पाण्याची खासियत काय..
तसेच या महिलांना एक सहायक पोलीस निरीक्षक देखील मदत करत या रॅकेटमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे अनेक पुरूषांची अर्थिक फसवणूक तसेच तुरूंगवास देखील भोगावा लागत आबे. आता या याचिकेची दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालकांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये कुणाची नावं समोर येणार? काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.