Download App

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार भाजपात; मंत्री नितेश राणे यांनी केला मोठा दावा

भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते रोहित पवार यांच्याबद्दल खळबळजनक दावा केला आहे.

  • Written By: Last Updated:

Nitesh Rane On Rohit Pawar : भाजप मंत्री नितेश राणे यांनी आता एक मोठा आणि खळबळजन दावा केला आहे. (Rohit Pawa) शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेते रोहित पवार हे 2019 सालीच भाजपात येणार होते, असा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे.

आमदार रोहित पवार हे 2019 सालीच भाजपात येणार होते, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. रोहित पवार हे मनाने भाजपात आहेत तर शरीराने शरद पवार यांच्यासोबत आहेत, असंही नितेश राणे म्हणाले आहेत. रोहित पवार हे 2019 सालीच भाजपात येणार होते. ते कुठल्या वेळी कोणत्या भाजपाच्या नेत्यांना भेटात हे आम्ही बोलायला लागलो तर रोहित पवार यांनात तोंड वाचवायला जागा राहणार नाही असंही ते म्हणालेत.

अवकारीका; तून रोहित पवारचे पदार्पण! मॉडेल-फॅशन कोरियोग्राफर रुपेरी पड‌द्यावर झळकणार

रोहित पवार हे मनाने भाजपात आहेत. शरीराने शरद पवार यांच्या पक्षात आहेत, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे. दरम्यान, रोहित पवार हे शरद पवार यांच्या पक्षातील तरुण आणि तडफदार नेते मानले जातात. भाजपा तसेच सत्ताधाऱ्यांवर त्यांनी वेळोवेळी टीकेचे आसूड ओढलेले आहेत. रोजगार, शिक्षण, शेती आदी क्षेत्रांतील प्रश्नांना घेऊन ते सरकारला घेरताना दिसतात. त्यांना नुकतेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

शशिकांत शिंदे यांची प्रदेशध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची आणि पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेलच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. दरम्यान, या नव्या जबाबदारीमुळे रोहित पवार यांचे त्यांच्या पक्षातील वजन वाढलेले आहे. असे असताना आता नितेश राणे यांनी त्यांच्याबाबत वरील दावा केला आहे. त्यामुळे आता राणे यांच्या दाव्यावर रोहित पवार नेमकं काय उत्तर देणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

follow us