Download App

खळबळजनक ! बीडमध्ये तरूणीने स्वत:च्या लग्नाच्या दिवशीच मामाच्या घरात घेतला गळफास, धक्कादायक कारण…

Bride Ends Life Due To Harassment And Blackmail In Beed : छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडच्या एका तरूणीने आत्महत्या (Bride Ends Life) केली. अतिशय धक्कादायक ही घटना घडली होती. छेडछाडीला कंटाळून तरूणीने (Beed News) मामाच्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. 20 एप्रिल रोजी म्हणजेच आजच्या दिवशी या तरूणीचं लग्न होणार (Crime News) होतं. ही बाब धक्कादायक म्हणावी लागेल. याप्रकरणी आरोपी अभिषेक कदम याला अटक करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे त्याला लगेच जामीन मिळाला.

बीडची ही घटना आहे. दहा-बारा मुलं असतील बहुतेक. यांची टोळीच आहे. हे मुलींना फसवतात. त्यांचे फोटो काढणार आणि मग त्यांना ब्लॅकमेलिंग करणं, हे त्या मुलांचं एक कामच आहे. हे त्यांचं एक रॅकेटचं आहे. यामध्ये दोन मुली देखील (Beed Crime) सामील आहेत. आमची एवढीच मागणी आहे की, त्यांच्यावर मकोका लागावा. आणि कायमस्वरूपी त्यांना जेलमध्ये टाकून द्यावं, अशी मागणी पीडित मुलीच्या आईने केली आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाला द्राक्षाची आरास, भाविकांची सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी

बीडच्या तरुणीने छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. तिने तरुणीने मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आजच्या दिवशी म्हणजे 20 एप्रिल रोजी या मुलीच लग्न होतं. या प्रकरणी आरोपी अभिषेक कदम याला अटक करण्यात आली, मात्र त्याला लगेचच जामीन सुद्धा मिळाला. यामुळे पुनः एकदा बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

सातासमुद्रापार मराठीचा डंका! ‘या’ चार मराठी चित्रपटांची कान्स महोत्सवाच्या चित्रपट बाजारासाठी निवड

मृत मुलीला आरोपी अभिषेक कदम याने छळले होते, असा आरोप पीडित मुलीच्या आईने केलाय. पीडितेने स्वत:ला लग्नाच्या दिवशीच संपवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे कुटूंब अन् परिसरात मोठी खळबळ उडाली. लग्नाच्या दिवशीच मुलीचा मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाईला सुरूवात देखील केली.

पोलिसांनी आरोपी अभिषेकला तात्काळ बेड्या देखील ठोकल्या. परंतु, लगेच आरोपीला जामीन देखील मिळाला. यामुळे परिसरात संतापाचे पडसाद उमटत आहेत. बीडमध्ये नक्की काय चाललंय? असा प्रश्न यामुळे निर्माण होतोय.

 

follow us