Beed News : मराठा विरूद्ध ओबीसी वाद चिघळळा; मनोज जरांगे पाटलांच्या मूळगावी दगडफेक

Beed News : मराठा विरूद्ध ओबीसी वाद चिघळळा; मनोज जरांगे पाटलांच्या मूळगावी दगडफेक

Manoj Jarange Matori Village : मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभा करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यातील मातोरी या मूळगावी दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. (Manoj Jarange) डीजे वाजवण्याच्या वादातून गावातील दोन गट आमनेसामने आल्याने ही दगडफेकीची घटना घडल्याचं समजतय. या घटनेनंतर गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून या गावात (Maratha Reservation) पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अक्षर-कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण; दणदणीत विजयासह टीम इंडिया फायनलमध्ये

परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

डिगोद्री येथे उपोषणास बसलेले प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे गोपीनाथ गडावरून पाडळसिंगीमार्गे भगवानगडावर जाणार होते. त्यांचं स्वागत करण्यासह त्यांना भगवानगडाकडे नेण्यासाठी मातोरी परिसरातील माळेगाव, पारगाव, तिंतरवणी आदी गावांतील ओबीसी बांधव हे डीजे लावून पाडळशिंगीकडे निघालेले होते. मातोरीत आल्यानंतर डीजेवर काही गाणे वाजवले. यावर मातोरी गावातील काही लोकांनी डीजे बंद करा, गाणे वाजवू नका असं सांगितले. हे बोलत असतानाच त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर याचे रूपांतर दगडफेकीत झालं. यामध्ये दोन्ही गटांचे लोक जखमी झाले आहेत. तसंच गाणं वाजवलेला डीजे आणि काही दुचाकींचीही तोडफोड करण्यात आली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू इंद्रायणी नदी गजबजली; संत तुकाराम महाराज पालखीचे आज प्रस्थान, भाविकांची मोठी गर्दी

मातोरी गावापासूनच मातोरी-पाथर्डी-अहमदनगर हा महामार्ग जातो. या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. मराठा, ओबीसी यांच्यात वाद झाल्यानंतर काही लोकांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांवरही दगडफेक केली. रात्री ९ वाजेनंतर या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. दरम्यान, दोन गटांत वाद झाल्याचे समजताच गावात धाव घेतली. दगडफेकीत काही नुकसान झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, ही दगडफेक का करण्यात आली आणि कोणी केली ही दगडफेक? याचा पोलीस आता तपास करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज