Download App

जालन्यातील मराठा आंदोलनास्थळी गेलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांवर हल्ला

  • Written By: Last Updated:

Jalna Maratha Andolan : जालन्यात घडलेल्या लाठीचार्जच्या घटनेते अनेक आंदोलक आणि नागरिक जखमी झाले आहेत. काल झालेल्या या हिंसाचाराच्या घटनेनंतर अजूनही परिस्थिती नियंत्रणात नसल्याचं दिसतं. कारण, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवली भागातील सराटी येथे आंदोलनस्थळी गेलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात काल मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमाराचे व्हिडिओही समोर आले आहेत. शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने संतप्त आंदोलकांनी दगडफेक आणि बसेस जाळल्या. दरम्यान, आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर आज शरद पवार यांनी आंदोलनस्थळी जात होते.

ते आज साडेअकरा वाजताच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल झाले होते. त्यानंतर ते अंबड रुग्णालयाला भेट दणार होते. त्यावेळी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचे पथक शरद पवारांच्या ताफ्यात सुरक्षेसाठी गेले होते. मात्र यावेळी काही अज्ञातांनी डीएसपी सिद्धेश्वर भोरे यांच्या शासकीय वाहनावर दगडफेक केली. तसेच कारला लाथ मारून फोडण्याचा प्रयत्न केला. वाढती गर्दी पाहून पोलिसांनी त्यांना हटवले आणि मोठी दुर्घटना टळली.

आंदोलनाचे विरोधक राजकारण करतायत का? वळसे पाटलांची फडणवीसांपेक्षा वेगळी भूमिका 

दरम्यान, पवारांनी आज जालण्यात जाऊन मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनकर्ते सहकारी यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी आंदोलकांशी चर्चा केली. अंबड रुग्णालयात या आंदोलनताील जखमी उपचार घेत आहेत. पवारांनी त्यांचीही भेट घेतली. शांततेनं आंदोलन सुरू ठेवावं असा सल्ला त्यांनी दिला.

यानंतर त्यांनी आपल्या भाषणात सरकारवर टीका केली. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जुनी आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे मराठा आंदोलकांना पुन्हा पुन्हा उपोषण करावे लागत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. सरकारने आश्वासन न पाळल्याने हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचं पवारांनी सांगितलं.

 

 

 

Tags

follow us