आंदोलनाचे विरोधक राजकारण करतायत का? वळसे पाटलांची फडणवीसांपेक्षा वेगळी भूमिका

  • Written By: Published:
आंदोलनाचे विरोधक राजकारण करतायत का? वळसे पाटलांची फडणवीसांपेक्षा वेगळी भूमिका

Maratha Reservation Agitation : जालन्यातील सराटी येथील मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे. तर सराटी येथे आता राजकीय नेत्यांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सरकारच्या आदेशानेच हा लाठीचार्ज झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधक बोट दाखवू लागले आहेत. यावर आता सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पण वळसेंची प्रतिक्रिया फडणवीस यांच्यापेक्षा वेगळी आहे. काही जण वाहत्या गंगेत हात धुवून घेत असल्याचे फडणवीस यांनी म्हणत विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांकडून राजकारण होत नसल्याचे वळसे यांनी म्हटले आहे.


जालन्यातील मराठा आंदोलनस्थळी गेलेल्या शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांवर हल्ला

पुण्यात जालन्यातील घटनेशी बोलताना मंत्री दिलीप वळसे म्हणाले, शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या उपोषणामध्ये गडबड झालेली आहे. त्यातून पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. हे प्रकरण पोलिसांनी अधिक संयमाने हाताळणे आवश्यक होते. यात कोणत्याही राजकीय पक्षाचा समावेश नाही. परंतु काही लोक फायदा घ्यायचा प्रयत्न करत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी बसून लक्ष घातले पाहिजे, असे आवाहनही वळसे यांनी केले आहे. परिस्थिती पोलिसांनी संयमाने हाताळणे आवश्यक होती. एेवढी आक्रमक भूमिका का घेतली हा चौकशीचा भाग आहे. त्यातून वास्तव समोर येईल, असे वळसे म्हणाले.


Sharad Pawar : मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल?; पवारांनी सांगितलं मास्टर प्लानिंग

शरद पवार यांनी आंदोलनस्थळाला दिलेली भेट व विरोधकांकडून राजकारण होतेय का ? या प्रश्नावर वळसे म्हणाले. विरोधकांकडून राजकारण केले जात आहे, असे मला वाटत नाही. शरद पवार हे आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी गेले. अशा प्रकारच्या घटना कुठेही घडल्या तरी शरद पवार हे तेथे जातात. पण अन्य घटक आहे. विशेष करून समाजामध्ये वेगळी भूमिका मांडतात. त्यातून हे घडले असावे. विरोधकांकडून राजकारण घडतेय असे मला वाटत नाही. सर्वांचाच मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली तर ती संयमाने सोडविली पाहिजे, असे वळसे म्हणाले.

Maratha Reservation Agitation

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube