Download App

बँकेची फसवणूक; किसन वीर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष व भाजप नेते मदन भोसलेंना सीबीआयचा दणका

बँकेकडे कर्ज मिळवण्यासाठी खोटी आर्थिक विवरणपत्रे सादर केल्याप्रकरणी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनानावर गुन्हा दाखल.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Cbi Registered Case Against Kisan Veer Sugar Factory :  बँक ऑफ इंडियाची ६१ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने कर्ज मिळवण्यासाठी खोटी कागदपत्रे व माहिती देऊन ही फसवणूक केली आहे. (Sugar Factory ) या तक्रारीत बँकेने कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष चंद्रकांत बजरंग इंगवले, कार्यकारी संचालक अशोक भार्गव जाधव व इतर यांच्या विरोधात सीबीआयकडे तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

रक्कम कारखान्याला दिली  आम्हाला तडीपार करणारे तडीपार झाले, विजय संकल्प मेळाव्यात फडणवीसांचा ठाकरेंना टोला

या बँक ऑफ इंडियाचे 2010 सालापासून कारखान्यासोबत चांगले व्यवहारिक संबंध होते. त्यामुळे या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यास विस्तारीकरण करण्यासाठी पन्नास कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं. ही रक्कम सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या करंट खात्यावर वळवण्यात आली. यावेळी बँकेने एक कोटी ७० लाख ४३१ रुपये ३८ पैसे व्याज खात्यामध्ये जमा करून घेऊन ही रक्कम कारखान्याला दिली होती. त्यानंतर ही रक्कम कारखान्याकडून थकीत झाली.

बँक ऑफ इंडिया

पुढे कारखान्याने डोंबिवली नागरी सहकारी बँकेकडून कारखान्याच्या डिस्टिलरी उभारणीसाठी ‘बँक ऑफ इंडिया’ ला दिलेली मालमत्ता तारण देऊन बँकेची फसवणूक केली. कर्ज मिळवण्यासाठी बँकेकडे खोटी आर्थिक विवरणपत्रं व कागदपत्रं सादर केली व बँकेच्या सुविधांचा गैरविनियोग केला, असंही या तक्रारीत म्हटलं आहे.

आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा  अन्यथा मी राजकारण सोडून देईल; युवकाच्या घरी सांत्वनपर भेट, पंकजा मुंडे ढसा-ढसा रडल्या

सदरचे कर्ज प्रकरण थकबाकीत गेल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आलं आहे. त्यामुळे बँक ऑफ इंडियाचे पुणे विभागीय व्यवस्थापक (वसुली) अनिल कुमार श्रीवास्तव यांनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी सी.बी.आय (नवी दिल्ली) यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर 24 मे 2024 रोजी पुणे येथील पोलीस आयुक्तालयात सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त (नवी दिल्ली) मनीष हिरालाल नवलाखे हे अधिक तपास करत आहेत.

follow us

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज