आम्हाला तडीपार करणारे तडीपार झाले, विजय संकल्प मेळाव्यात फडणवीसांचा ठाकरेंना टोला

आम्हाला तडीपार करणारे तडीपार झाले, विजय संकल्प मेळाव्यात फडणवीसांचा ठाकरेंना टोला

Mahayuti Vijay Sankalpa Melava : महायुतीचा आज ठाण्यात विजय संकल्प मेळावा झाला. या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गट आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. कोकणात महायुतीला प्रचंड यश मिळालं. (Devendra Fadnavis) काही लोक म्हणाले आम्ही तुम्हाला तडीपार करू मात्र, कोकणच्या जनतेने त्यांना तडीपार केलं असंही फडणवीस म्हणाले आहेत. तसंच, आता कोकण पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक आली आहे. तेव्हा पुन्हा एकदा कोकणचा आशीर्वाद महायुतीला मिळणार आहे, असंही ते म्हणाले आहेत.

जे मुंब्र्यात घडलं तेच भिवंडीत घडलं Father’s Day : ठाकरे, पवार अन् फडणवीस, राजकारण गाजवणारी ‘बाप’ माणसं

यावेळी फडणवीसांनी राज ठाकरे यांचे आभारही मानले. अभिजीत पानसे हे उमेदवार होते. पण आम्ही राज ठाकरे यांना विनंती केली. निरंजन डावखरे आमचे आमदार आहेत. आपण महायुती म्हणून काम करत आहोत. त्यामुळे तुम्ही उमेदवाराला थांबायला सांगावं. त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी निर्णय घेतला आणि अभिजित पानसे यांनी सर्व मेहेनत निरंजन यांच्या पाठीशी उभी केली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान, त्यांनी भिवंडीची जागा येऊ शकली नाही. तिकडे काय घडले ते माहीत आहे. जे मुंब्र्यात घडलं तेच भिवंडीत घडलं असं म्हण ते आपण सुधारू असा आशावाद व्यक्त केला.

मॅन टू मॅन पोहचयाचं आहे

आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निश्चितपणे चांगला उमेदवार महायुतीने दिला आहे. इतर निवडणुकीपेक्षा नियोजनाची आणि वेगळी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये सभा- रॅली घ्यायच्या नाही. मॅन टू मॅन पोहचयाचं आहे. सव्वालाख नोंदणी झाली आहे. ठाणे जिल्ह्यावर जास्त जबाबदारी आहे. पालघरवर आणि इतर जिल्ह्यांवर जबाबदारी आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

जुनी पेंशन योजनेवर तोडगा निघेल अन्यथा मी राजकारण सोडून देईल; युवकाच्या घरी सांत्वनपर भेट, पंकजा मुंडे ढसा-ढसा रडल्या

निरंजन चेहेरा जेवढा पुढे नेणार तेवढा फायदा होणार आहे. जुनी पेंशन योजनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडगा काढला आहे. हा प्रश्न विधान सभेत मांडला जाणार आहे. मोठा निर्णय आपण घेतला आहे. संघटनेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 2005 पूर्वी शिक्षक होते. त्यांच्याबाबत सकारात्मक कारवाई करत प्रश्न सोडवले जात आहेत. आपल्या काळात अनेक प्रश्न सोडत आहे आणि ते आपल्या मागे उभे आहेत, असंही फडणवीस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube