Download App

आमदार धस अन् मंत्री धनंजय मुंडे भेटीवर बावनकुळेंचा नवा गौप्यस्फोट; म्हणाले, ही भेट सुमारे २७ ते २८..

धनंजय मुंडे-सुरेश धस यांच्या भेटीमुळे संपूर्ण राज्यातून धस यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. तसेच, विरोधी पक्षाकडूनही धस

  • Written By: Last Updated:

Chandrashekhar Bawankule on meeting Dhas Munde : मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या भेटीमुळे संपूर्ण राज्यात वादळ उठलेले असतानाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या भेटीची समर्थन करताना पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. मुंडे आणि धस यांच्यात सुमारे २७ ते २८ दिवसांपूर्वीच भेट झाली आहे. (Dhas) त्या बैठकीचे राजकारण केलं जात आहे, हे दुर्दैवी आहे, अशी खंत व्यक्त करताना मुंडे-धस भेटीचे पुन्हा एकदा समर्थन केलं आहे.

आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो, असं सांगितलं आहे. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी धसांना पुन्हा एकदा तोंडघशी पाडत ही भेटी सुमारे महिनाभरापूर्वी झाल्याचं म्हटलं आहे. तसंच, सुरेश धस यांच्याकडून ‘या भेटीची बातमी धनंजय मुंडे यांच्या लोकांनीच फोडल्याचा आरोप आहे. मात्र, त्याने काय होते, असा सवालही बावनकुळेंनी विचारला आहे.

संजय राऊत जे बोलले ते बरोबरच, पवारांनी विश्वासघात केला विनायक राऊतही संतापले

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्यात 27 ते 28दिवसांपूर्वी भेट झालेली आहे. त्यावेळी आमचा एकच प्रयत्न होता की, संतोष देशमुख यांचे मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी सर्वजणांनी मिळून काम केले पाहिजे. त्यात सुरेश धस, धनंजय मुंडे असो अथवा आम्ही असो. सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.

धनंजय मुंडे-सुरेश धस यांच्या भेटीमुळे संपूर्ण राज्यातून धस यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. तसेच, विरोधी पक्षाकडूनही धस यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्या भेटीमुळे राज्याचे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. धनंजय मुंडे यांच्यासोबत कुठलीही भेट झालेली नाही. मी फक्त त्यांची विचारपूस करण्यासाठी चार दिवसांपूर्वी गेलो होतो, असा दावा धस यांनी केला आहे. मात्र, या चंद्रशेखर बावनकुळे तर 28 दिवसांपूर्वी भेट झाल्याचे सांगत आहेत, त्यामुळे बावनकुळेंनी सुरेश धस यांना पुन्हा एकदा उघडे पाडले आहे.

धनंजय मुंडे यांच्या लोकांनीच भेटीची बातमी फोडल्याचा आरोप होत आहे. त्यावरही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, त्याने काय फरक पडतो. आमचं एकचं म्हणणं आहे की, आमचा फोकस काय आहे, तर संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्यांना फाशीची देण्याचा आमचा प्रयत्न आहे. धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न आहे. त्यावर मी काही बोलू इच्छित नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

धस-मुंडे बैठकीचे आणि बोलण्याचे राजकारण केले जात आहे, हे दुर्दैवी आहे. उलट आमचा सर्वांचा एकच हेतू आहे की संतोष देशमुख खून प्रकरणातील एकही आरोपी सुटू नये. कुठलाही पुरावा शिल्लक राहू नये. या प्रकरणातील सर्व पुरावे कोर्टात गेले पाहिजेत आणि संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

 

follow us

संबंधित बातम्या