Download App

छत्रपती संभाजीनगर घोषणेचा जनक कोण? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतच सांगितलं…

छ. संभाजीनगर : औरंगाबादचं नामांतर महाविकास आघाडीच्या काळात झाल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत ठामपणे सांगितलं आहे. महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या आजच्या वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरची पहिल्यांदा कोणी घोषणा केली होती? हे स्पष्ट केलंय. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

Udhav Thackeray : जगातला शक्तिमान नेता अन् हिंदू पंतप्रधान असूनही…

ज्यावेळी 1988 साली शिवसेनेची छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेवर सत्ता आली होती. त्यावेळी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची मराठा सांस्कृतिक मैदानात सभा पार पडली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांना दंडवत घालत मी आजपासून औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करत असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरती सुरू, महिन्याला मिळणार 70 हजार रुपये पगार

सत्तासंघर्षानंतर औरंगाबाद नामांतराचा श्रेयवाद शिंदे आणि ठाकरे गटामध्ये दिसून येत होता. आम्ही छत्रपती संभाजीनगर असं नामांतर केल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता. मात्र, सत्तेतून खाली येण्याआधीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून औरंगाबाद आणि उस्माबादच्या नामांतराच्या प्रस्तावास मंजूरी दिली असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावताना बाळासाहेबांनी नामांतराबाबत पहिल्यांदा भाष्य केलं असल्याचं स्पष्ट केलं आहे.

अखेर काँग्रेसचं ठरलं ! Rahul Gandhi सूरतला जाणार; ‘त्या’ निर्णयाला देणार आव्हान

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी सभेला जमलेल्या गर्दीवरुन विरोधकांना टोला लगावला असून आजतागायत छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा जेव्हा मी आलो तेव्हा तेव्हा गर्दीचा दुष्काळ मला कधीच दिसलेला नाही. नेहमीच कार्यकर्त्यांचं प्रेम अन् गर्दी पाहायला मिळाल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

Pune Crime News:राष्ट्रवादीच्या सरपंचाला निर्घृणपणे संपविले; मावळ हादरले!

तसेच मागील वर्षी 8 जूनला मी छत्रपती संभाजीनगरला आलो होतो, मधल्या काळातही अनेकदा आलो होतो, पण आज अभिमानाने आणि आनंदाने संभाजीनगरमध्ये आलो असल्याचं त्यांनी सांगितलंय. आजपर्यंत कोणत्याही सरकारला जे जमलं नाही ते तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने करुन दाखवल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Jagdish Mulik : बॅनरच्या मद्द्यावरून विरोधकांचं घाणेरडं राजकारण

दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र, श्रीराम नवमीच्या दिवशी दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. हाणामारीचं नंतर दगडफेकीत रुपांतर झाल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावग्रस्त वातावरण होतं.

सोबतच शिंदे गट आणि भाजपची सावरकर गौरवयात्राही छत्रपती संभाजीनगरमध्येच दाखल होती. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी मिळणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता, अखेर सभेला परवानगी मिळाली.

Tags

follow us