Udhav Thackeray : जगातला शक्तिमान नेता अन् हिंदू पंतप्रधान असूनही…
छ. संभाजीनगर : हिंदू पंतप्रधान असूनही हिंदुंना जनआक्रोश मोर्चे का काढावे लागतात? असा खोचक सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही सोडलेलं नाही. उद्धव ठाकरेंनी आजच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अमित शाहांवरही टीकेची तोफ डागली आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार तयारी सुरु होती. अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून खेड, मालेगावपेक्षाही अधिक कार्यकर्ते सभेत सामील झाले आहेत.
…तर पक्षाचे नाव बदलून ‘भ्रष्ट जन पार्टी’ ठेवा; उद्धव ठाकरेंचा संभाजीनगरमधून हल्लाबोल
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पदवी विचारल्यास 25 हजारांच्या दंडाला सामोरं जावं लागत आहे. अलीकडे डॉक्टरेट पदवी सुद्धा विकत घेता येत आहे. अनेकपदवीधरांच्या पदवीला किंमत नाही अन् दुसरीकडे पंतप्रधानांची पदवी विचारली म्हणून मागितली तर दंड होत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केलीय.
‘अमृता’ नाव लकी, अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरसोबत लग्न? कोल्हेंनी शेअर केली पोस्ट
नूकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टरेट पदवी मिळाली आहे. त्यांच्या डॉक्टरेट पदवीवरुनही त्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधत ती पदवी मिळवलेली नसून मिळाली असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच मिळालेली पदवी घरी जाऊन भींतीला लावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.
इम्रान खानच्या दाव्याने खळबळ ! म्हणाले, माजी लष्करप्रमुखांनी भारताबरोबर..
सध्या सत्ताधारी सरकारला गौरवयात्रा अन् हिंदु जनआक्रोश मोर्चा काढावा लागत आहे. जगातील सर्वात शक्तीमान हिंदु नेता पंतप्रधान असूनही जनतेला आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येत आहे. महाविकास आघाडीच्या काळात कोणत्याही समाजाला आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ आली नव्हती, पण हिंदु पंतप्रधान असताना आक्रोश मोर्चा का काढावा लागत आहे, असा खोचक सवाल त्यांनी केला.
विधानसभा निवडणूका लोकसभेसोबत होणार? शरद पवारांनी सांगितला त्यांचा अंदाज
एकीकडे मी हिंदुत्व सोडल्याचा आरोप होतोय, तर तुम्ही काश्मीरमध्ये मुक्ती मेहबूबासोबत मांडीला मांडी लावून बसला होतात, तेव्हा हिंदुत्व कुठं गेलं होतं? मी हिंदुत्व सोडल्याचं एक उदाहरण दाखवा लगेच घरी बसेन, असंही उद्धव ठाकरेंनी भरसभेत स्पष्ट केलं आहे.
सध्या देशात तुम्ही म्हणाल तोच हिंदुप्रेमी, देशद्रोही, असं असेल तर गाडल्याशिवाय राहणार नाही. आमच्या हिंदुत्वाची मोजमाप करणारं तुम्ही कोण? असा सवाल उपस्थित करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याचं दिसून आलंय.