Jagdish Mulik : बॅनरच्या मद्द्यावरून विरोधकांचं घाणेरडं राजकारण

Jagdish Mulik : बॅनरच्या मद्द्यावरून विरोधकांचं घाणेरडं राजकारण

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचे अलीकडेच निधन झाले. खा. बापट हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दरम्यान, त्यांचं निधन झाल. आता त्यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भावी खासदार असे बॅनर लागले होते. यामुळे मुळीक हे टीकेचे धनी झाले. दरम्यान, मुळीक यांनी या बॅनरबदद्ल भाष्य केलं. भावी खासदाराचे बॅनर हे भाजप कार्यकर्त्यांनी लावले नव्हते, असं सांगत बॅनरवरून घाणेरडं राजकारण करत असल्याचं मुळीक म्हणाले.

खा. बापट यांचं निधन होऊन चार दिवस झाले. 40 वर्ष पुण्याच्या राजकारण – समाजकारणावर छाप सोडणारा नेता गेल्यानं शहरात शोकमग्न वातावरण आहे. तर दुसरीकडे मात्र, पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून कोणाला संधी दिली जाणार आहे, याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुळीक यांना शुभेच्छा देणारे बॅनर सगळकीडे झळकले. तर काही अति उत्साह असललेल्या कार्यकर्त्यांनी मात्र, मुळीक यांचा बॅनरवर भावी खासदार असा उल्लेख केला.

सफरचंदाचा ज्यूस पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
त्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत मुळीकांना चांगचं सुनावलं. मुळीक हे खा. बापटांच्या मरणाची वाट पाहात होते का…. अशा शब्दात विरोधकांनी मुळीक यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर खा. गिरीश बापट यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर लगेच मुळीकांनी दावा सांगितल्यानं पुणेकर संतप्त झाले. या प्रकारानंतर हे बॅनर हटवण्यात आले.

दरम्यान, आता मुळीक यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल आपलं स्पष्टीकरण दिलं. मुळीक यांनी सांगितलं की, भावी खासदाराचे बॅनर हे भाजप कार्यकर्त्यांनी लावले नव्हते. आमच्याकडून आवाहन करण्यात आलं होतं की, वाढदिवस साजरा नाही करणार. मात्र, काही लोकांनी चुकीचे बॅनर लावले. त्यातला जो बॅनर व्हायरल होतो आहे, ज्यावर विरोधक घाणेरडं राजकारण करत आहेत. खरंतर बापटांच्या जागी आपण खासदार व्हावं, हे आमच्या मनातही आलं नाही, असं मुळीक यांनी सांगितलं.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube