सफरचंदाचा ज्यूस पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

सफरचंदाचा ज्यूस पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

मुंबई : आजवर तुम्ही अनेकदा असे ऐकले असेल की दररोज एक सफरचंद खाल्ल्याने अनेक आजारांना दूर ठेवले जाऊ शकते. अनेक पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असलेले सफरचंद हे शरीरासाठी खूपच लाभदायक आहे. याचे नेहमी सेवन करावे असा सल्ला देखील आपल्याला दिला जातो. हे फळ आपण खाऊ शकतो तसेच याचे ज्यूस देखील अनेकांकडून पसंत केले जाते. आपण दररोज एक ग्लास सफरचंद रस पिणे आवश्यक आहे. आज आपण सफरचंदाचा रस पिण्याचे काही फायदे जाणून घेऊ

पौष्टिक घटकांचा खजिना
सफरचंदांत फ्लेव्होनॉइड्स, पॉलीफेनॉल आणि अँटिऑक्सिडंट असतात जे आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असतात. सफरचंदात पोटॅशियम आणि इतर आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. सफरचंदाच्या रसाचे सेवन केल्याने शरीरास अनेक फायदे सहज मिळू शकतात.

दमा
अनेकांना दम्याचा त्रास असतो, मात्र या आजारात तुम्ही सफरचंदाच्या रसाचे सेवन करू शकतात. सफरचंदाच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात जे तुमचे श्वसन कार्य सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. अस्थमाचा त्रास कमी करण्यासाठी सफरचंदाच्या रसाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.

पचन प्रक्रिया
सफरचंद खाल्ल्यानंतर काही लोकांना गॅस्ट्रिक आणि आम्लपित्ताचा त्रास जाणवतो. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की सफरचंदाचा रस पिल्याने बद्धकोष्ठता कमी होते आणि पचन सुधारते. यामध्ये सॉर्बिटॉल कंपाऊंड असते जे पचनासाठी चांगले असते.

Weight Loss साठी
चुकीच्या जीवनशैलीमुळे वजन वाढणे हि समस्यां अनेकांना जाणवत असेल मात्र यावर सफरचंदाचा रस हा प्रभावी ठरू शकतो. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सफरचंदाच्या रसाचा आहारात समावेश करा. हे पचन सुधारते आणि चयापचय वाढवते. त्यामुळे याच्या नियमित सेवनाने तुमचे वजन कमी होण्याची दाट शक्यता असते.

BJP Maharashtra : आमदारांच रिपोर्ट कार्ड आलं; उमेदवारी देताना राज्यातही ‘गुजरात पॅटर्न’

कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते
सफरचंदाचा रस रोज सकाळी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते. सफरचंदाच्या रसामध्ये असलेले अनेक पोषक घटक शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात.

काळजी घ्या! कोरोना वाढतोय, मुंबई महानगर पालिका सरसावली

डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले
चांगली दृष्टी मिळविण्यासाठी, व्हिटॅमिन ए जास्त असलेले पदार्थ खावेत आणि सफरचंद भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच सफरचंदाचा रस प्यायल्याने तुमची दृष्टी वाढू शकते. एक ग्लास सफरचंदाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांशी संबंधित आजार आणि गुंतागुंत होण्याचा धोकाही कमी होतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube