Download App

नगरपालिका, महापालिकेच्या निवडणूका कधी होणार? CM फडणवीस म्हणाले, ‘जानेवारीत…’

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अंतिम सुनावणी ठेवली. लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात.

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : गत तीन-चार वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका (Local Body Elections) रखडल्या आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. मात्र निवडणुका कधी होणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, यावर भाष्य केले आहे.

राजीव गांधींनी मुस्लिमांच्या विरोधामुळे ज्या पुस्तकावर बंदी घातली, ‘त्या’ पुस्तकाला 36 वर्षांनी भारतात मिळाली एन्ट्री 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भातील मंत्री आणि भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचा नागपुरात जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आज नागपुरात असून त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, मला वाटते की सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अंतिम सुनावणी ठेवलेली आहे. मला अशी अपेक्षा आहे की, जानेवारी महिन्यातच सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी अंतिम सुनावणी घेईल आणि जानेवारीतच निर्णय देईल. त्यानंतर जो काही वेळ असेल तो घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील, असं फडणवीस म्हणाले.

Satish Wagh Murder Case : पत्नीचं निघाली मास्टरमाईंड, प्रेमप्रकरणातून सुपारी देऊन पतीला संपवलं… 

निवडणुकीच्या तारखा ठरविण्याचा अधिकार आमचा नसून सर्वोच्च न्यायालयाचा आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. आम्ही देखील सरकार या नात्याने या बाबतीत जास्तीत जास्त प्रयत्न करत असून लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे, असेही फडणवीस म्हणाले.

अनधिकृत होर्डिंग्जबाबत काय म्हणाले?
दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी होर्डिंग्ज संदर्भात लिहिलेल्या पत्रावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाच्या भरात बेकायदा होर्डींग्ज लावतात. आमच्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असे बॅनर लावले होते, पण मी त्यांना ते काढायला लावले. या अनधिकृत होर्डिंग्जबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

follow us