Download App

CM फडणविसांचा अहिल्यानगर दौरा; अण्णा हजारेंच्या हस्ते स्वागत, पोपटराव पवारांच्या मुलाच्या विवाह समारंभास भेट

  • Written By: Last Updated:

CM Devendra Fadnavis visited Dr Popatrao Bhaguji Pawar Sons Wedding : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे आज अहिल्यानगर दौऱ्यावर होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. पोपटराव भागुजी पवार या यांच्या मुलाच्या विवाह समारंभास त्यांनी भेट दिलीय. डॉ. पोपटराव भागुजी पवार यांचे चि. प्रसन्न आणि चि. सौ. कां. तनुजा यांचा आज लग्नसोहळा (Ahilyanagar) पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत नवदांपत्याला शुभाशिर्वाद दिले आहेत.

Maharashtra : ‘मला वाटते, भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावे…’; मंत्रिपद मिळताच कोकाटेंचा भुजबळांना टोला

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे होते. जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी अहिल्यानगर येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण आदरणीय आण्णासाहेब हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केलं.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. अण्णा हजारे यांना समाजसेवेसाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी आमदार संग्राम जगताप, शिवाजीराव कर्डिले, काशिनाथ दाते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे हे उपस्थित होते.

VIDEO : ठाकरे बंधूंचे सूत जुळले? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत दिसले एकत्र, चर्चांना उधाण

विळदघाट येथुन दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या मेडीकल कॉलेज हेलिपॅडवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्री विखे पाटील हे अहिल्यानगरकडे रवाना झाले. अहिल्यानगरमधील सावेडीतील नगर मनमाड रोड येथील हुंडेकरी लॉन्समध्ये डॉ. पोपटराव भागुजी पवार यांच्या मुलाला विवाह समारंभ आयोजित केलेला होता. येथे दुपारी दोन वाजता लग्नसोहळ्याला हजेरी लावली.

अहिल्यानगर येथून दोन वाजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री विखे पाटील हे पुन्हा विळदघाट येथे रवाना झाले. तेथून 2 वाजून दहा मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघाले. त्यानंतर डॉ. राधाकृष्ण विखे पाटील हे लोणीकडे रवाना झाले. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये व्यस्त असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगरमध्ये आज हजेरी लावली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी कोपर्डी बलात्कार आणि खून पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला देखील उपस्थिती दर्शवली होती.

 

follow us