Eknath Shinde : राज्यात महायुतीचा जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. काही जागांवर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे (Lok Sabha Election) नाव नव्हते. त्यावेळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यानंतर जागावाटपाच्या चर्चा करण्यासाठी आमदार खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत. परंतु, मु्ख्यमंत्र्यांची भेट काही होत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे अज्ञातस्थळी रवाना झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री नेमके कुठे आहेत, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.
Eknath Shinde : जागा वाटप योग्य पद्धतीने होईल, शिवतारेंना युती धर्म पाळावाच लागणार!
लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र अजूनही महायुतीचं जागावाटप पूर्ण झालेलं नाही. काही ठिकाणी तिढा आहे. तरीदेखील शिंदे गटाने आठ उमेदवारांची घोषणा केली. परंतु, या यादीत मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचेच नाव नव्हते. त्यामुळे राजकारणात वेगळ्या चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्री असतानाही श्रीकांत शिंदे यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर करता आलं नाही. काहीतरी गडबड नक्कीच आहे, अशा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या.
कल्याण लोकसभा मतदारसंघावर भादपनेही दावा सांगितला आहे. त्यामुळे युतीत तणाव वाढला होता. या कारणामुळे मुख्यमंत्री शिंदे कमालीचे नाराज झाले होते असे सांगण्यात येत होते. त्यानंतर काल मंत्री दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील इच्छुक उमेदवार किरण सामंत मु्ख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आले होते. या सर्व मंत्री आमदारांनी तब्बल तीन तास मुख्यमंत्र्यांची वाट पाहिली. पण भेट काही झाली नाही.
Eknath Shinde : मेरिटच्या आधारेच पक्ष अन् चिन्हाचा निर्णय; CM शिंदेंच्या अजितदादांना शुभेच्छा
यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत, किरण सामंत, आमदार सुहास कांदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर चर्चा केली. राज्यात ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे प्रचार कसा करायचा यावर चर्चा करण्यासाठी बैठक होती. या बैठकीत पुढील नियोजनावर चर्चा करण्यात आली. तसेच ज्या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत त्या जागा सोडायच्या नाहीत यावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.