Cockroach Janta Party : अवघ्या काही दिवसांतच देशभरात चर्चेत आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (Cockroach Janta Party) इंस्टाग्राम खात्याविरोधात मुंबई सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीयं. कॉक्रोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम खात्यावरील फॉलोअर्सच्या संख्येत होत असेलली चढ-उतार संशयास्पद असून याची चौकशी करण्याती मागणी वकील अरविंद सिंह यांनी मुंबईत पोलिसांत केलीयं. या तक्रारीमुळे आता कॉक्रोच जनता पार्टीच्या या खात्याबाबत पोलिस चौकशी करणार असल्याच्या हालचाली सुरु झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता काही दिवसांतच चर्चेत आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे इंस्टाग्राम अकाऊंटच्या तपासात काय समोर येईल? याची उत्सुकता सर्वांनाच लागलीयं.
भेसळ ओळखा, सुरक्षित अन्न निवडा; फूड सेफ्टी ऑन व्हील्स मोहिमेतून प्रशासनाकडून नागरिकांना मार्गदर्शन
कॉक्रोच जनता पार्टीच्या इन्स्टाग्रा खात्याविरोधात मुंबई पोलिसांकडे सायबर तक्रार करण्यात आलीयं. या खात्यावरील हालचाली संशयास्पद असून अल्पावधीतच त्यांच्या फॉलोवर्सची संख्या वाढलीयं आहे. या फॉलोअर्सच्या संख्येत अनेक नाट्यमय चढ-उतार दिसून येत आहेत. सोशल मीडिया मार्केटिंगद्वारे फॉलोअर्स वाढवल्याचा संशय वकील अरविंद सिंह यांनी व्यक्त केला आहे. मेसेजद्वारे विकत घेतलेले हे फॉलोअर्स असून हा त्यांचा पॅटर्न आहे. फॉलोअर्स 100, 200 ने कमी होतात पण यामध्ये 10 ते 20 हजारांनी कमी-जास्त होत असल्याचं दिसून येत असल्याचं वकील अरविंद सिंह यांनी स्पष्ट केलंय.
इंस्टाग्राम खात्यविरोधात तक्रार झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी प्रतिक्रिया दिलीयं. कॉक्रोच जनता पार्टी देशाच्या युवकांना संदेश देत आहे. तुम्ही या पार्टीला फेक म्हणाल तर तुम्ही मोठी चूक करतायं. देशातील तरुणांची तक्रार आहे की आमच्या अडचणी कोणी ऐकत नाहीत. आत्ताही तुम्ही पुन्हा तीच चूक करत आहात. त्यामुळे या तरुणांच तुम्ही ऐका त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घ्या, असं दीपके यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, नीट पेपर लिक प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतरला मोठं आंदोलन करीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलीयं. त्यानंतर काल पुण्यात अभिजित दीपके यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यातही मोठं आंदोलन करणार असल्याची घोषणा केलीयं. त्यामुळे आता पुढील काळात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची दिशा, इंस्टाग्राम खात्याविरोधातील तक्रार? यासंदर्भात नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
