Download App

मोदींचं नाव घेतलं नाही तरीही का झोंबलयं? ‘पनौती’ वरुन नाना पटोलेंचा भाजपला सवाल

Nana Patole : राजस्थानमधील प्रचार सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Narendra Modi) यांचा अप्रत्यक्षपणे ‘पनौती’ असा उल्लेख केला. त्यावरुन देशात रणकंदन सुरु झालं. याच प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या दिवशी ‘पनौती’ शब्दाचा सोशल मीडियावर ट्रेंड झाला, ती एक जनभावना होती, राहुल गांधींनी मोदींचं नाव घेतलं नाही तरीही का झोंबलयं? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

मराठवाड्याच्या पाण्याचे आंदोलन तापले; गायकवाड थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडकले!

नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत असताना सभेतील गर्दीतूनच ‘पनौती’…’पनौती’ असा आवाज येत होता, त्यासंदर्भाने राहुल गांधी बोलले आहेत. त्यात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी अथवा कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नाही तरीही भाजपाला ते का झोंबले? त्यातून मोदींचा अपमान कसा होतो? असे सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केले आहेत.

Bageshwar Baba : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबांकडून संत तुकाराम महाराजांचं दर्शन

तसेच अहमदाबाद स्टेडियमवरील क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनल मॅच दरम्यान ‘पनवती’ हा शब्द सोशल मीडियावर ‘ट्रेंड’ झाला होता, आजही तो ‘ट्रेंड’ होत आहे, ती एक जनभावना आहे पण सर्वठिकाणी मीच आहे असे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत असल्याची खोचक टीकाही नाना पटोले यांनी यावेळी केली आहे.

‘रिलायन्स पश्चिम बंगालमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक करणार’; मुकेश अंबानींची घोषणा

काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी जालोरमध्ये सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “ते (मोदी) क्रिकेटच्या मॅचला जाणार, ते मॅच हरणार ही वेगळी गोष्ट आहे, पनौती! पीएम म्हणजे पनौती मोदी.” “बरं, आपली टीम तिथे वर्ल्ड कप जिंकली असती, पण तिथे पनौतीचा पराभव झाला, पण टीव्हीवाले हे म्हणणार नाहीत. जनतेला हे माहीत आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देखील उपस्थित होते. यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. राजस्थान येथे विधानसभा निवडणूक प्रचारसभेत राहुल गांधीनी मोदींना पनौती म्हटले. “अच्छे भले हमारे लड़के वहा पे वर्ल्ड कप जीत जाते, पर पनौती ने हरवा दिया” असे त्यांनी म्हटले होते.

follow us