Bageshwar Baba : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबांकडून संत तुकाराम महाराजांचं दर्शन

Bageshwar Baba : बागेश्वर बाबा (Bageshwar Baba ) म्हणजेच बागेश्वर धामचे धीरेंद्रशास्त्री सध्या तीन दिवस पुण्यात भागवत कथा सांगणार आहेत. या दरम्यान त्यांनी देहूमध्ये संत तुकाराम महाजांचं दर्शन घेतलं.

यावेळी त्यांनी आपण केलेल्या तुकाराम महाराजांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिली.

धीरेंद्रशास्त्री यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली.

यावेळी आपल्या संत तुकाराम महाजांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, मी त्याबद्दल माफी मागितलेली आहे.
