Devendra Fadnavis : पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होणार नाहीत. कारण महाराष्ट्रात 50 टक्केपेक्षा जास्त भागात कायम दुष्काळजन्य परिस्थिती असते. (Devendra Fadnavis) ती बदलण्यासाठी पाणीदार महाराष्ट्र करणं हा एकमेव पर्याय आहे असं प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते पुण्यात बीजेएस नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये बोलत होते.
आज अनेक मुलांना 99 टक्के गुण मिळतात. परंतु, त्यांच्या या गुणांमध्ये काही मुल्यांचं रोपण झालं का? त्यांच्या गुणांमध्ये काही कौशल्य मिळालं का असं म्हणत आजच्या परिस्थितीमध्ये फक्त मार्क्स महत्वाचे नाहीत तर त्यामध्ये मुल्य विचार फार महत्वाचे आहेत. त्याचबरोबर फडमवीस यांनी संविधानावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले मुलांना संविधान समजावण हे प्राथमिक कर्तव्य आहे. कारण सर्वांना संविधान समजने हे पहिलं कर्तव्य आहे असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
CM पदाची शपथ घेताच पहिला चौकशीचा फेरा कुणाच्या मागे?; फडणवीसांची स्पष्ट संकेत देणारी पोस्ट
माझं एकच काम आहे की ज्या ज्या ठिकाणी सज्जन लोक चांगलं काम करत आहेत त्यांच्या पाठिशी उभं राहण हे महत्वांच काम आहे. आज महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन, इतर हे पाण्याविषयी काम चालू आहे त्या सर्व कामांत माझा कायम सपोर्ट असेल असं आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिलं. त्याचबरोबर पाणी योजनेवर सरकारचं लक्ष असणार आहे असं आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिलं आहे.
देशात जी फाईव्ह ट्रिलीयन इकॉनॉमी आहे त्यातील मोठा हिस्सा हा जैन समाजाचा असतो. जैन समाजाने मोठ्या प्रमाणात कायम देण्याचं काम केलं आहे. तसंच, हा समाज जितकं कमावतो त्यापेक्षा जास्त देण्याचं काम करतो असं म्हणत फडणवीस यांनी जैन समाजाचं कौतुक केलं आहे. तसंच, समाजात सकारात्मक काम करण्याचं काम जैन समाज कायम करत आला आहे असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.