Devendra Fadnavis : पोलिसांनीच (Parbhani Police) न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सुर्यवंशींची (Somnath Suryavanshi) हत्या केली. सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केला. या प्रकरणात पोलिसांसोबतच मुख्यमंत्रीही जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटलं यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं.
‘मस्क’चा भारतीयांना झटका! एक्स प्रिमियम प्लान्सच्या दरात मोठी वाढ; आता ‘इतके’ पैसे मोजा
राहुल गांधी हे केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते, लोकांमध्ये जाती-जातीत भेद निर्माण करायचे ते गेली अनेक वर्ष करत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. छगन भुजबळ यांच्याबद्दल बोलतांना ते म्हणाले की, आम्ही सगळे त्यांचा सन्मान करतो. मंत्रिमंडळात समावेश केला नाही, कारण आमच्या मनात त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा विचार होता. तसेच भुजबळांसारखे नेते आमच्यासोबत असलेच पाहिजेत, असं फडणवीस यांनी म्हटले आहे.
2024 मध्ये आव्हानात्मक भूमिका, बॅक टू बॅक हिंदी प्रोजेक्ट्स ; सईची बॉलिवूडला पडलेली भुरळ
राहुल गांधींच्या परभणी दौऱ्याविषयी विचारलं असता फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी हे केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते. ही राजकीय भेट होती. लोकांमध्ये जाती जातीत भेद निर्माण करायचे ते गेली अनेक वर्ष काम करत आहे. त्यामुळं मला असं वाटतं की, त्यांचे जे विद्वेषाचे काम आहे, ते त्यांनी त्या ठिकाणी जाऊन केलं. आमचे सरकार संवेदनशील असल्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी कऱण्यात येणार आहे. यात सर्व काही समोर येईल आणि एकाही आरोपीला सोडले जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे.
राहुल गांधींचा आरोप काय?
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गंभीर मोठा आरोप केला. ते म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या पोलिसांनी केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून हे स्पष्ट झालंय की, 100 टक्के ही हत्या आहे. पोलिसांनीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ यांची हत्या केली. सोमनाथ हे दलित असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणात राजकारण नको, तर न्याय हवा, असं ते म्हणाले.
पुढं ते म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा.