सेटलमेंट नंतरचा पार्ट पहिले…; दादांच्या खास राहिलेल्या आमदारानं पवारांना दिला युतीचा ‘रोड मॅप’

Dharmaraobaba Atram On Sunetra Pawar : बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी

Dharmaraobaba Atram On Sunetra Pawar

Dharmaraobaba Atram On Sunetra Pawar

Dharmaraobaba Atram On Sunetra Pawar : बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात पाहायला मिळत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून वेगवेगळे दावे देखील करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मान्य करुन शरद पवार गटाचे विलीनीकरण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व्हावे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलं आहे. तसेच अजित पवार यांनी कधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत विलीनीकरणाची चर्चा सुरु आहे असं सांगितले नव्हते असा खुलासा देखील एका मुलाखतीमध्ये बोलताना धर्मराव बाबा आत्राम यांनी केला आहे.

या मुलाखतीमध्ये धर्मराव बाब आत्राम म्हणाले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मान्य करुन शरद पवार गटाने विलीनीकरण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व्हावे. जर विलीनीकरण व्हायचे असेल तर नेतृत्व फक्त सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडे असावे. शरद पवार गटातील नेत्यांनी राजकीय वास्तविकता मान्य करावी. तसेच सुप्रिया सुळे यांची भूमिका एकसंघ पक्षात काय असणार? या जर तरच्या गोष्टी आहेत. राज्य आणि केंद्रात ॲडजस्टमेंट करता येईल. एकत्रित झाल्यानंतर कसे ॲडजस्टमेंट करायचे हे आमचे नेते करतील असं धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.

विलीनीकरणावर देखील या मुलाखतीमध्ये धर्मराव बाब आत्राम (Dharmaraobaba Atram) यांनी मोठा दावा केला आहे. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार (Sharad Pawar) गटासोबत अजित पवारांची जी काही चर्चा झाली होती. ती महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठी होती. ती चर्चा फक्त स्थानिक पातळीवरील निवडणुका संदर्भात होती. दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबद्दल नव्हती असं त्यांनी म्हटले आहे. तर आता अजित पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत, आता राष्ट्रीय अध्यक्ष ही त्यांनीच व्हावे. प्रफुल्ल पटेल यांनीही ते राष्ट्रीय अध्यक्ष हणार नाही हे स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या नंतर दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण व्हावे असे मला वाटते असं देखील या मुलाखतीमध्ये धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.

काय सांगता, क्रिकेटमध्ये होणार चक्क 73 नवीन बदल; जाणून घ्या कधी आणि कोणते नियम लागू होणार-

पुढे बोलताना ते म्हणाले की, दोन्ही पक्षाच्या एकत्रीकरणानंतर एकसंघ राष्ट्रवादीचा नेतृत्व फक्त सुनेत्रा पवार यांच्याकडेच असावं. त्याच आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष ही होतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना यायचे आहे. आमच्या सोबत यायचे असेल तर त्यांनी एनडीएची पॉलिसी स्वीकार केली पाहिजे. त्याच प्रमाणे सुनेत्रा पवार यांचे देखील नेतृत्व मान्य केले पाहिजे असं देखील धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.

Exit mobile version