Imtiaz Jaleel : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Elections) एमआयएमकडून (Aimim) जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. आज (19 ऑगस्ट) प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या उपस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत (Mumbai) एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीमध्ये मुंबई प्रदेशाध्यक्षपद बदलण्यावरून दोन गटामध्ये राडा झाला. माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासमोर दोन्ही गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद देखील झाला आहे.
माहितीनुसार, आज मुंबईमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी इम्तियाज जलील मुंबईत आले होते. यावेळी पक्षाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबई प्रदेश अध्यक्ष बदलण्यात आला. एमआयएमने मुंबई अध्यक्ष फैयाज अहमद (Fayyaz Ahmed) यांना पदावरून हटवले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये फैयाज अहमद यांच्या समर्थकांनी राडा केला. त्यामुळे दोन्ही गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते मात्र त्यापूर्वीच एमआयएमचे कार्यकर्ते भिडले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
#WATCH | Mumbai: A scuffle and verbal altercation broke out at the press conference of AIMIM Maharashtra chief Imtiaz Jaleel. The altercation ensued when Faiyaz Ahmed Khan was replaced by Raiees Lashkaria as the Mumbai AIMIM chief and supporters of Faiyaz Ahmed Khan registered… pic.twitter.com/53vY6MQq5w
— ANI (@ANI) August 19, 2024
भारताला धक्का, मोहम्मद शमी बांगलादेश सिरीजमधून आऊट, ‘या’ दिवशी संघात परतणार
एमआयएमने फैयाज अहमद यांच्या जागी रईस लष्करिया (Rais Lashkaria) यांच्याकडे मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे फैयाज अहमद यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांचा देखील विरोध केला अशी देखील माहिती समोर आली आहे.
‘मोहब्बत की दुकान खोलने से कूछ नही होता…,’ कॉंग्रेसच्या झिशान सिद्दीकींचा राहुल गांधींना घरचा आहेर