बेरोजगार तरुणांचा अंत पाहू नका, खवळले तर प्रलय येईल; संमेलनाध्यक्ष शोभणेंचा सरकारला इशारा

Dr. Rabindra Sobhane sahitya Sammelan speech : देशासह राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारी (Unemployment) वाढत आहे. रोजगार निर्मिती झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात तरुणांच्या हाताला कामचं नसल्याचं दिसतं. दरम्यान, बेरोजगारीच्याच मुद्दावरून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे (Dr. Rabindra Sobhane) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सरकारवर टीकेची झोड उठवली. बेरोजगारीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला […]

बेरोजगार तरुणांचा अंत पाहू नका, खवळले तर प्रलय येईल; संमेलनाध्यक्ष शोभणेंचा सरकारला इशारा

Dr. Rabindra Sobhane

Dr. Rabindra Sobhane sahitya Sammelan speech : देशासह राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारी (Unemployment) वाढत आहे. रोजगार निर्मिती झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात तरुणांच्या हाताला कामचं नसल्याचं दिसतं. दरम्यान, बेरोजगारीच्याच मुद्दावरून अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे (Dr. Rabindra Sobhane) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सरकारवर टीकेची झोड उठवली. बेरोजगारीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. तरुणाईची ऊर्जा ही वाहत्या पाण्यासारखी असते. ती जशी सृजनाची गंगोत्री होऊ शकते, तशी तरुणांच्या हिताचे न घडल्यास प्रलयाचे कारणही ठरू शकते, अशा शब्दात शोभणेंनी सरकारला इशारा दिला आहे.

All India Rank : सेक्रेड गेम्स अन् मसान फेम लेखक बनले दिग्दर्शक, आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला 

अमळनेर येथे शुक्रवारी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते संमलेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी अध्यक्षपदावरून शोभणे बोलत होते. यावेळी बोलतांना शोभणे म्हणाले की, बेरोजगारीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. उद्या जर बेरोजगारीमुळे तरुणही शेतकऱ्यांप्रमाणेच आपलं जीवन संपवू लागले तर ते खापर कुणाच्या डोक्यावर फोडायचे? एक लक्षात ठेवा, तरुणाईची ऊर्जा ही वाहत्या पाण्यासारखी असते. ती जशी सृजनाची गंगोत्री होऊ शकते, तशी तरुणांच्या हिताचे न घडल्यास प्रलयाचे कारणही ठरू शकते, अशा थेट शब्दात संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Hi Anokhi Gath : श्रेयस अन् मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र, ‘या’ दिवशी येणार ‘ही अनोखी गाठ’ 

यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांच्यासह महामंडळाचे सर्व अधिकारी व संघटक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना संमेलनाध्यक्ष शोभणे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात आता आपल्याला काहीही करायचे नाही, असं ठरवून सरकारने या क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. एकीकडे प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे उच्चशिक्षित तरुण प्राध्यापकाची नोकरी मिळण्याच्या प्रतिक्षेत म्हातारे झाले आहेत. शिक्षणाचा बाजार करणारी मंडळी ही शिक्षण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी बसली आहे. हे खूप धोकादायक आहे. तरुणाईचा तुम्ही किती अंत पाहणार आहात, असा सवालही शोभणेंनी केली.

प्राचीन काळी धर्म हा सर्वोच्चपदी होता. धर्मसत्ताक राज्ये ही धर्माची वेगळी गरज म्हणून तयार झाली. पुढे राजसत्तेनं धर्मसत्तेचं जोखड झुगारून देत धर्मसत्तेलाच अंकित ठेवलं. पुढे हाच राजा सर्वोच्च समजाला जाऊ लागला. धर्माचा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जाऊ लागला. इतिहासाची हीच चक्रे आता पुन्हा नव्या रुपाने फिरू लागली आहे, याकडेही शोभणेंनी आपल्या भाषणात आवर्जुन लक्ष वेधलं.

Exit mobile version