98 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार, 70 वर्षांनी होतेय दिल्लीत संमेलन

  • Written By: Published:
98 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार, 70 वर्षांनी होतेय दिल्लीत संमेलन

पुणे: सरहद (Sarhad) संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan) दि. 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 या काळात दिल्लीला होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवा (Sharad Pawar) या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष असणार आहेत.

‘तुम्ही फक्त दाढी अन् गोल टोप्या साफ करा’; राणेंचा ठाकरे, राऊतांवर खोचक वार 

जवळपास 70 वर्षांनी पुन्हा एकदा दिल्लीला मराठी साहित्य संमेलन होत आहे. दिल्ली ही देशाची राजकीय राजधानी असल्यामूळे येथे होणारे संमेलन सर्वसमावेशक व्हावे, या भावनेतून संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अनुभवी, ज्येष्ठ व साहित्यरसिक व्यक्ती व्हावी असा संयोजक समितीने प्रयत्न केला. त्यातून शरद पवार यांनी स्वागताध्यक्ष व्हावे, अशी संस्थेने विनंती केली आणि ती त्यांनी आज मान्य केल्याची माहिती सरहद संस्थेचे संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी आणि सुनिता राजे पवार तसेच संयोजन समितीचे डॉ. सतिश देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

EVM मध्ये फेरफार म्हणून भाजपला 10 टक्यांचा लाभ, रोहित पवारांचा खळबळजनक दावा 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंदीय मंत्री नितीन गडकरी या नेत्यांनाही संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आलंय.

शरद पवार हे केवळ उत्तम वाचक अथवा साहित्यप्रेमी नसून महाराष्ट्रातून सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीशी प्रारंभापासून जोडले गेलेत. त्यांनी औरंगाबाद (2004), नाशिक (2005), चिपळूण (2013) आणि सासवड (2014) येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे. तर 1990 साली त्यांनी स्वागताध्यक्ष व्हावे असे पुण्यातील संमेलनात समितीने ठरविले होते. मात्र त्यावर्षी ते होऊ शकले नाही. यंदा दिल्लीमध्ये महाराष्ट्राची अस्मिता ज्या व्यक्तींभोवती केंद्रीत असते त्यातून सर्वात ज्येष्ठ नाव शरद पवार यांचे आहे. त्यांच्या अनुभवांमुळे हे संमेलन अविस्मरणीय होईल आणि राजकारणाच्या पलिकडे जाऊन मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागर करणारे ठरेल, असा विश्वास संयोजन समितीने व्यक्त केला.

या पुढील कार्यक्रमांमध्ये आणि व्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ आणि विनोद तावडे यांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

70 वर्षांनी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन
दरम्यान, यापूर्वी 1954 साली दिल्लीला 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नाही.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube