‘तुम्ही फक्त दाढी अन् गोल टोप्या साफ करा’; राणेंचा ठाकरे, राऊतांवर खोचक वार

‘तुम्ही फक्त दाढी अन् गोल टोप्या साफ करा’; राणेंचा ठाकरे, राऊतांवर खोचक वार

Nitesh Rane News : तुम्ही फक्त दाढी आणि गोल टोप्या साफ करा, या शब्दांत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांवर जोरदार वार केलायं. बांग्लादेशात हिंदुंवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरुन संजय राऊतांनी भाजपवर कडाकून टीका केली. या टीकेनंतर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह राऊतांना चांगलच फैलावर घेतलंय.

नितेश राऊत म्हणाले, आज बांग्लादेशातल्या हिंदुंची काळजी घेण्यासाठी मोदींचं सरकार सक्षम आहे, परराष्ट्र मंत्रालय दिवस रात्र काम करीत आहे, म्हणूनच आज बांग्लादेशातल्या हिंदुंना चांगलं माहिती की मोदी सरकारमुळेच त्यांच आयुष्य वाचेल जीव वाचेल. बांग्लादेशातील परिस्थिती इंदिरा गांधींपेक्षाही चांगली हाताळण्याची क्षमता मोदींमध्ये आहे हा मला विश्वास आहे. तुम्ही फक्त दाढी, टोप्या साफ करत बसा हिंदुंची काळजी करु नका, असा खोचक वार नितेश राणेंनी केलायं.

तसेच बांग्लादेशात हिंदुंची काळजी, अचानक जिहाद ह्रदयसम्राट ठाकरेंच्या पक्षाच्या प्रवक्त्याला होणं ही विरोधाची गोष्ट आहे. विरोधकांना फक्त उठसूठ फक्त दाढीवाला आणि मुल्ला मोल्लवीच दिसता. ज्यांना राज्यात जिहाद्यांना समर्थन करुन मतदान मिळवायचं होतं. उबाठाचा प्रत्येक उमेदवार आज मुस्लिम समाजाच्या मतदानामुळेच निवडून आले आहेत. यांनी मौलवींबरोबर जेवढा वेळ घालवला त्यातील एक टक्काही वेळ त्यांनी साधू संतांना दिला नाही. त्या पक्षाचा प्रवक्ता संजय राऊत आरएसएस आणि भाजपला हिंदुत्व शिकवत असेल तर याच्यापेक्षा नालायक कोणीच असू शकत नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाहीत का?; शिंदेंच्या भेटीला गेलेल्या शिवतारेंचा संताप

संजय राऊत जेव्हा गोधडीत होता तेव्हापासून आरएसएस भाजप हे हिंदू समाजाची सुरक्षा काळजी घेत होते. या जगात कोणत्याही कानाकोपऱ्यातला हिंदूंची काळजी जेवढी आरएसएस भाजप करतात त्याच्या एक टक्काही उबाठा आणि याचा मालक करीत नाही, यांना फतवे लागतात, निकालात जनतेने नाकरलं तेव्हा आता यांना भगवा आठवतो, अशीही टीका नितेश राणे यांनी केलीयं.

काय म्हणाले होते संजय राऊत?
सरसंघचालक मोहन भागवत हे ज्येष्ठ आहेत. त्यांचा आदर आहे. त्यांची एक विचारधारा आहे. पण म्यानमार, कॅनडा नेपाळमध्येही हिंदू धोक्यात आहेत. देशातील अनेक ठिकाणी हिंदू धोक्यात असेल तर तो नरेंद्र मोदींच्या धोरणामुळे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पूर्ण जगातला हिंदू धोक्यात आलाय. बांगलादेशमध्ये हिंदूंचं सरंक्षण करू शकले नाहीत. आपल्या शेजारी देशांशी संबंध बिघडले असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube