आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाहीत का?; शिंदेंच्या भेटीला गेलेल्या शिवतारेंचा संताप

  • Written By: Published:
आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाहीत का?; शिंदेंच्या भेटीला गेलेल्या शिवतारेंचा संताप

मुंबई : एकीकडे मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची तारखी जवळ येत असतानाच एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) आमदार विजयबापू शिवतारे यांना संताप अनावर झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. मुंबईत शिंदेंची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिवतारेंची गाडी पोलिसांनी अडवल्यानंतर हा प्रकार घडला. यावेळी शिवतारेंनी उपस्थित पोलिसांना तुम्हाला आमदार, माजी मंत्री ओळखत येत नाहीत का? असा सवाल केला. (Police Stop MLA Vijaybapu Shivtare Car In Thane)

दिल्लीतील महायुतीच्या बैठकीची इनसाईड स्टोरी काय? अमित शाहांनी मागवलं रिपोर्ट कार्ड

नेमकं काय घडलं?

एकीकडे शपथविधी सोहळ्याचा दिवस जवळ येत असून, एकनाथ शिंदे गृहखात्यासह अन्य महत्त्वाच्या खाती शिवसेनेला मिळावी यासाठी आग्रही असून, दोन दिवसीय दरे गावाच्या भेटीनंतर काल (दि.1) शिंदे मुंबईत परतले आहेत. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी ठाण्यातील निवास्थानी नेत्यांची लगबग वाढली आहे. यातच पुरंदरचे आमदार विजयबापू शिवतारे (Vijay Shivtare) हे शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झाले होते. मात्र, यावेळी पोलिसांनी शिवतारे बापूंची गाडी अडवली. त्यामुळे बापूंचा राग अनावर झाला अन् त्यांनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावतं त्यांची शाळा घेतली.

राज्यात फडणवीसांच्या जागी वेगळं कुणी आणलं जातंय का? संजय राऊतांनी सांगितला आतला डाव

त्याचे झाले असे की, ठाण्यात शिंदेंची भेट घेण्यासाठी शिवतारे दाखल झाले. त्यावेळी तेथे सुरक्षेसाठी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवतारे बापूंना न ओळखल्याने गाडी थांबवली. त्यावेळी शिवतारेंचा राग अनावर झाल्याचे पाहण्यास मिळाले. डिपार्टमध्ये किती वर्ष झाली असा खडा सवाल करत तुम्हाला माजी मंत्री, आमदार ओळखता येत नाही का? असे खडेबोल शिवतारेंनी गाडी अडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सुनावले.

शरद पवारांचा मोहरा ‘तुतारी’ खाली ठेवणार; वारं फिरताच पवारांना पहिला धक्का

भेटीमागचं कारण काय?

यावेळी शिवतारेंनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, शिंदे काल दरे गावातून मुंबईत आले. मात्र, त्यावेळी मी छ.संभाजीनगरला होतो. आज मुंबईत दाखल होताच त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आल्याचे शिवतारे म्हणाले. यावेळी आमदारांची कोणतीही बैठक आयोजित करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खाते वाटपाबाबतचे सर्व अधिकार शिंदेंकडे असून,  ते जे काही निर्णय घेतील ते आम्हा सर्वांना मान्य असतील असे शिवतारेंनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube