All India Rank : सेक्रेड गेम्स अन् मसान फेम लेखक बनले दिग्दर्शक, आगामी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
All India Rank : ऑल इंडिया रॅंक (All India Rank) हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे सेक्रेड गेम्स ही वेब सिरीज आणि मसान या प्रसिद्ध चित्रपटाचे लेखक आणि गीतकार वरूण ग्रोव्हर (Varun Grover) यांचं दिग्दर्शन क्षेत्रातील पदार्पण आहे. या चित्रपटाचे पहिलं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह लेखन देखील वरूण ग्रोव्हर यांनीच केले आहे.
Hi Anokhi Gath : श्रेयस अन् मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र, ‘या’ दिवशी येणार ‘ही अनोखी गाठ’
या पोस्टरसह चित्रपटाची तारिख देखील जाहीर करण्यात आली आहे. 23 फेब्रुवारीला हा चित्रपट चित्रपट गृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासोबत यामी गौतमचा आर्टीकल 370 देखील रिलीज होत आहे. त्यामुळे बॉक्सऑफिसवर या दोन चित्रपटांची टक्कर होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 5 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या पोस्टरवरून चित्रपटामध्ये 90 च्या दशकातील मैत्री, प्रेम आणि स्पर्धा परिक्षांबाबतची कथा असल्याचे दिसत आहे.
अयोध्येनंतर ‘या’ मुस्लिम देशात उभारलं जातंय भव्य मंदिर, नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन
यामी गौतमच्या (Yami Gautam)आगामी ‘आर्टिकल 370’ (Article 370)या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता चांगलीच वाढली आहे. हा चित्रपट राजकीय ॲक्शन, ड्रामा अशा खऱ्या घटनांपासून प्रेरित आहे. त्यातील चमकदार स्टार कास्ट चित्रपटाला आणखी मनोरंजक बनवते. टीझरनंतर आता ‘दुआ’ चित्रपटाचं पहिलं वहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या चित्रपटातील पहिलं ‘दुआ’ हे गाणं देशाची निःस्वार्थपणे सेवा करणाऱ्या सर्वांसाठी एक सुंदर आदरांजली आहे. त्यातील स्टारकास्ट चित्रपटाला आणखी मनोरंजक बनवते.
रंजक टीझरनंतर आता ‘दुआ’ चित्रपटाचं पहिले गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे एक हृदयस्पर्शी गाणं आहे. हे गाणं प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal)आणि शाश्वत सचदेव (Shashwat Sachdev)यांनी संगीतबद्ध केलं आहे. शाश्वत यांनी या गाण्याचं संगीतही दिलं आहे. गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहेत, तर चित्रपटात महिलेचा आवाज प्रियांशी नायडू (Priyanshi Naidu)यांनी दिला आहे. हा चित्रपट 23 फेब्रुवारी 2024 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.