Video : राज ठाकरेंसोबतच्या गप्पांमुळे ‘ज्ञानात’ भर पडते…; शिवतीर्थावरील भेटीनंतर सामंतांचं विधान चर्चेत

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आपल्या ज्ञानात भर पडते असे विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले आहे. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली पण या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही असेही सामंत यांनी बोलताना स्पष्ट केले. (Uday Samant Meets Raj Thackeray)
Mahrashtra Politics : खरंच उदय सामंत एकनाथ शिंदेंना जय महाराष्ट्र करतील का ?
माझ्या आवाक्यातील प्रश्न विचारा…
यावेळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे युतीत एकत्र येणार का? हा माझ्यासाठी फार मोठा विषय असून एवढ्या पातळीवरच्या चर्चेमध्ये मी कधीच पडलेलो नाही म्हणून मी नेहमी सांगत की मला झेपतील आणि आवाक्यातील प्रश्न मला विचारले तर, त्याची उत्तरं मी देऊ शकतो असा टोलाही सामंत यांनी पत्रकारांना लगावला. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार असतील तर त्या दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे.
राज ठाकरेंसोबतच्या गप्पांनी ज्ञानात भर पडते
आजच्या भेटीत मराठी भाषा, विश्व मराठी संमेलन आणि दिल्लीत सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनाबाबत गप्पा मारल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आजच्या भेटीला कुणी राजकीय स्पर्श करू नये असे म्हणत आजची भेट ही अतिशय साधी आणि सिंपल भेट होती असे म्हणत राज ठाकरेंसोबत गप्पा मारल्यानंतर आपल्या ज्ञानातमध्येदेखील भर पडत असते. कारण त्यांच्या भाषणाची शैली, वकृत्व वेगळे आहे आणि त्यांच्यासोबत बोलल्यानंतर भविष्यामध्ये आपल्यामध्येदेखील सुधारणा होऊ शकते त्यामुळे तशाच पद्धतीने या भेटीकडे सर्वांनी बघितले तर बरं होईल असे सामंत म्हणाले.
‘मी वाट बघतोय…’ राज ठाकरेंनी दिलं निमंत्रण, सोशल मिडिया पोस्ट चर्चेत
राज ठाकरेंचे आभार मानले
पुढे बोलताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पुण्यामध्ये जे विश्व मराठी संमेलन झाले होते. त्या कार्यक्रमाला मराठी भाषा संवर्धन मंत्री म्हणून राज साहेबांना उपस्थित राहण्याची विनंती केली होती. माझ्या विनंतीला मान देऊन राज ठाकरे कार्यक्रमाला आले होते तसेच त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केले होते. पण त्यानंतर त्यांची आणि माझी भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे विनंतीला मान देऊन पुण्यातील कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिल्याबद्दल राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी आज भेट घेतल्याचे सामंतांनी सांगितले.