Letter from Eknath Khadse : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (दि. २० नोव्हेंबर)रोजी मतदान होणार असून (दि. २३ नोव्हेंबर) रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. (Eknath Khadse ) त्यामुळे या निवडणुकीकडं अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. यातचं आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं एक पत्र समोर आलं आहे.
नाथाभाऊ, हा देवेंद्र फडणवीसचा शब्द, राज्यपालपदावरून एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
एकनाथ खडसे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत पुढची निवडणूक मी पाहील की नाही हे ईश्वरच ठरवेल, पुढच्या निवडणुकीत मी असेल किंवा नसेल, अशी भावनिक साद एकनाथ खडसे यांनी घातली आहे. तसंच आपण आता कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणाही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
एकनाथ खडसे काय म्हणाले?
येत्या २० तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक रोहिणी खडसे लढत आहेत. मी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या बरोबर आहे. आपणही मला सहकार्य केलं. तुमच्या सुख आणि दुःखात देखील मी सहभागी झालो. कोणताही धर्म आणि जात न पाहता मी आतापर्यंत मदत करण्याची भूमिका निभावली. पण तब्येतीच्या कारणास्तव या पुढची निवडणूक मी पाहील की नाही? हे इश्वरच ठरवेल. कारण पुढच्या निवडणुकीत मी असेन किंवा नसेन. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करतो की, रोहिणी खडसे या निवडणुकीत उभ्या आहेत. आपण मला जसं सहकार्य केलं तसं रोहिणी खडसे यांनाही सहकार्य करा, अशी भावनिक साद एकनाथ खडसे यांनी जनतेला घातली आहे.
एकनाथ खडसेंची मोठी घोषणा
महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. खरं तर राज्यात युती आणि आघाडीच्या राजकारण सुरु आहे. त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रमुख सामना पहायला मिळणार असून, निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र, यातच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मोठी घोषणा करत आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातील व्हिडीओ देखील त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे.
मुक्ताईनगर मतदासंघांतील मायबाप जनतेला माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे साहेब यांचे विनम्र आवाहन
यापुढे मी निवडणूक न लढाविण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या सोबत आहे. अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केले आहे, मला आशीर्वाद दिले आहेत. मी ही तुमच्या सुख दुःखात सहभागी… pic.twitter.com/FDbNFcQ1L6
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) November 18, 2024