Video : अजित पवारांच्या राष्ट्रवादी घड्याळासमोरच ‘वाजले की बारा’ व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी नागपूर कार्यालयात मला जाऊ द्या ना घरी, वाजले की बारा या गाण्यावर लावणी नृत्य सादर केलं आहे.

News Photo (82)

News Photo (82)

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा लावणीवर डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नागपूर कार्यालयातील हा व्हिडीओ आहे. (NCP) मिळालेल्या माहितीनुसार 2 महिन्यांपूर्वी पक्षाच्या या कार्यालयाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. याच कार्यालयात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिला पदाधिकारी शिल्पा शाहीर यांनी लावणी नृत्य सादर केलं आहे. याच नृत्याचा व्हिडीओ आता समोर आला असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मला जाऊ द्या ना घरी, वाजले की बारा या गाण्यावर हे लावणी नृत्य सादर करण्यात आले आहे.

या  व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यावेळी नृत्य सादरीकरणादरम्यान राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्यासह शहरातील महिला आणि पुरुष पदाधिकारी उपस्थित होते. याच नृत्याबाबत अनिल अहिरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नागपूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी दिवाळी स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. लावणी महाराष्ट्राची संस्कृती आहे. या कार्यक्रमात मीसुद्धा डान्स केला. बघणाऱ्यांच्या नजरेत दोष आहे, अशी प्रतिक्रिया अहिरकर यांनी दिली.

ती; आत्महत्या नाही तर हत्या, फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राहुल गांधींचा गंभीर आरोप 

दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आम्ही पारिवारिक लोक उपस्थित होतो. शिल्पा शाहीर नागपूर शहर उपाध्यक्षा आहेत. सगळे बसलेले आम्ही पदाधिकारी होतो. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लोक उपस्थित होते. आम्ही महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांनी नृत्य केले. जसा कुटुंबात आनंद साजरा करतो तसा त्यावेळी आनंद साजरा करण्यात आला. ज्यांनी ज्यांनी चांगले सादरीकरण केले त्यांच्यासाठी तरुणांनी वन्स मोअरं केलं. त्यात काही वावगं नाही, असे स्पष्टीकरणही अहिरकर यांनी दिले.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या नृत्य सादरीकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अजित पवार यांच्या पक्षावर सडकून टीका केली आहे. मी व्हिडिओ पाहिला नाही. मात्र लावणीची संस्कृती जपत असतील कदाचित. शरद पवार यांच्या पक्षातून जे सोडून गेले ते असे प्रकार करत आहेत. त्यांनी पक्षाचे पार 12 वाजवून टाकले आहेत, अशी घणाघाती टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच शरद पवार यांनी हा पक्ष वाढवला. हा पक्ष लोकांनी घराघरात पोहोचवला. मात्र ते पक्ष चोरून घेऊन गेले. आता ते पक्ष कार्यालयात वाजले की बारा हे गाणं लावत आहेत. पक्षाचेच बारा वाजले आहेत. हे सगळं लाजीरवाणं आहे, असेही पुढे आव्हाड म्हणाले.

Exit mobile version