मुंबई : आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात ‘चतुरस्र’ हा शब्दही फिका पडावा अशी चौफेर कामगिरी बजावत, गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण (Padma Vibhushan)आशा भोसले (Asha Bhosle)यांना शुक्रवारी (दि.24) सायंकाळी 6 वाजता भव्य सोहळ्यात राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award)प्रदान करण्यात येणार आहे. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अशा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने राज्य शासनाकडून (Maharashtra state Government)गौरविण्यात येते. 2021 या वर्षीच्या पुरस्कार आशा भोसलेंना जाहीर झाला आहे. तो पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बाल विकास प्रकल्प मुंबई अंतर्गत 38 रिक्त जागांची भरती सुरु; 4 एप्रिल शेवटची तारीख
विविध छटा असलेली अनेक प्रकारची गाणी अजरामर करणाऱ्या आशा भोसलेंचा जन्म 1933 साली झाला. संगीत आणि नाटकाचा वारसा असलेल्या आशा भोसले यांनी लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. आशा भोसले यांची कारकीर्द सुरू झाली 1943 साली. त्यानंतर 1948 मध्ये त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.
त्यांनी बॉलीवूडमध्ये सात दशकं अधिराज्य गाजवले आहे. बॉलीवूडध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी प्ले-बॅक सिंगर म्हणून आवाज दिला आहे. बॉलीवूडमध्ये आशाताईंना ‘मेलडी क्वीन’ म्हणून ओळखले जाते. आशा ताईंनी आत्तापर्यंत 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. आशा भोसले, 1943 पासून या क्षेत्रात आहेत. ज्यात त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत.
विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे 2011 साली आशा भोसले यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले. आशा भोसलेंनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, तमिळ, इंग्रजी अशा भाषेत गाणी गायली आहेत. भोसलेंना 18 वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळाले होते.
आशा भोसलेंच्या या सोनेरी कारकीर्दीचा सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार थाटात होणार आहे.
या कार्यक्रम प्रसंगी ‘आवाज चांदण्याचे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. यावेळी सुदेश भोसले, साधना सरगम, ऋषीकेश कामेरकर, आर्या आंबेकर, बेला शेंडे, मधुरा दातार हे कलाकार आशा भासले यांच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. अभिनेता सुमित राघवन या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहे.
हा कार्यक्रम सर्व प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे. शिवाजी नाट्यमंदिर दादर, दामोदर हॉल परळ, प्रबोधनकार ठाकरे नाटयगृह बोरीवली, दिनानाथ नाटयगृह विलेपार्ले, काशिनाथ घाणेकर नाटयगृह ठाणे, वासुदेव बळवंत फडके नाटयगृह पनवेल, आचार्य अत्रे नाटयगृह, कल्याण, गडकरी रंगायतन ठाणे, विष्णूदास भावे नाटयगृह, वाशी या नाटयगृहावर कार्यक्रमाचा सन्मानिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर उपलब्ध होणार आहेत. या पुरस्कार समारंभास तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सर्वांना सस्नेह उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.