बाल विकास प्रकल्प मुंबई अंतर्गत 38 रिक्त जागांची भरती सुरु; 4 एप्रिल शेवटची तारीख

बाल विकास प्रकल्प मुंबई अंतर्गत 38 रिक्त जागांची भरती सुरु; 4 एप्रिल शेवटची तारीख

बाल विकास प्रकल्प (Bal Vikas Prakalp) मुंबई (एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प योजना प्रकल्प मुंबई) ने अंगणवाडी मदतनीस (Anganwadi helper) या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या पत्यावर ऑनलाईन पध्दतीनं अर्ज भरायचे आहेत. बाल विकास प्रकल्प मुंबई भरती मंडळ, मंबई यांनी मार्च 2023 च्या जाहीरातीत एकूण 38 रिक्त पदांची घोषणा केली आहे. या अंगणवाडी मदनीस या रिक्त पदांच्या 38 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईनं अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटी तारीख 4 एप्रिल आहे. या भरतीसाठी पात्रता, वयोमर्यादा याबाबतची माहिती जाणून घेऊ.

पदाचे नाव-
अंगणवाडी मदतनीस

रिक्त जागा – 38
नोकरीचे ठिकाण – मुंबई

शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असाव. त्यासाठी उमेदवाराने 10 वी मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवाराने मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून 12 वी पास, पदवी, पव्युत्तर, डी.एड बीएड, एमएससीआयटी शिक्षणं घेणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा-
18 ते 35 वर्षादरम्यान
विधवा उमेदवारांसाठी 5 वर्ष सुट

वेतन
शासकीय नियमानुसार

अर्ज पाठवण्याचा पत्ता
बालविकास प्रकल्प अधिकारी,
प्रभादेवी यांचे कार्यालय 117.
बीडीडी चाळ, वरळी, मुंबई – 18 पहिला मजला – 18

आवश्यक कागदपत्रे
उमेदवाराचा फोटो
10 वी, 12 वी गुणपत्रक
शैक्षणिक प्रमाणपत्रे
जातीचा दाखला
विधवा/ अनाथ उमेदवार असल्यास प्रमाणपत्र
लहान कुटुंब असलेबाबतेच प्रमाणपत्र

संभाजीराजे विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये हॉट कॉफीसह..

अंगणवाडी मदतनीस या पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी दिलेल्या संबंधित अर्ज पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. उमेदवाराने अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे व माहिती खोटी आढळल्यास उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 4 एप्रिल 2023 रोजी पर्यंत सादर करावा. त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. महत्वाचं म्हणजे, उमेदवारा हा प्रभादेवी प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवासी असावा

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1i8hocFCycpKwJMI9JspZpfSZvFXET3qY/view

● अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल
● अधिक माहिती www.mumbaicity.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube