Download App

महायुती सरकारचा लाडकी बहिण योजनेवर पहिला घाव; ५ महिन्यांचे पैसे झाले सरकारजमा

लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करताना विशिष्ट निकष पाळले जाणे आवश्यक होते. मात्र काही लाभार्थींनी निकष डावलून योजना

  • Written By: Last Updated:

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सत्तेवर येताच लाडकी बहिण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी सुरू केली आहे. धुळे येथील एका महिलेच्या पाच महिन्यांच्या निधीची परतफेड सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने महिलांसाठी “लाडकी बहिण योजना” राबवली. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला १५०० रुपये महिना निधी मिळणार होता.

Bangladesh Violence : तर मुस्लिमांना लाडकी बहिण योजनेतून वगळा; नितेश राणेंचा शाब्दिक वार

सध्या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक ठिकाणी अनियमितता आणि अपात्र लाभार्थींना निधी मिळाल्याच्या तक्रारी समोर आल्या. निवडणुकीपूर्वी सरकारने देखील सरसकट अर्ज स्विकारले. तेव्हाच पडताळणी केली असती तर आज ही वेळ सरकारवर आली नसती. निवडणुकीत महिलांच्या मताचा लाभ मिळण्याचे ध्येय सरकारचे होते, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

निकष डावलून मिळवला लाभ

लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करताना विशिष्ट निकष पाळले जाणे आवश्यक होते. मात्र काही लाभार्थींनी निकष डावलून योजना राबवणाऱ्या यंत्रणेला फसवले. अशा प्रकारच्या तक्रारी विशेषतः धुळे, जळगाव, वर्धा, गडचिरोली आणि पालघर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात समोर आल्या. धुळे जिल्ह्यातील नकाणे गावात राहणाऱ्या एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर प्रशासनाने तिच्याकडून पाच महिन्यांचा निधी, म्हणजे ७५०० रुपये परत घेतले.

धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या माहितीनुसार, योजनेच्या पारदर्शकतेसाठी सर्व अर्जांची तपासणी सुरू आहे. योजनेचा गैरफायदा घेतलेल्या लाभार्थींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिण योजनेतील अपात्र अर्जदार ओळखण्यासाठी सर्व अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. तक्रारीच्या आधारावर केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका असलेल्या अर्जदारांना वगळता अन्य सर्व अर्जांची तपासणी होणार आहे.

follow us