Download App

मुंबईत भीषण अपघात, भरधाव टेम्पोने 6 जणांना चिरडलं, महिलेचा मृत्यू

Ghatkopar Accident : मुंबईत पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असल्याचं

  • Written By: Last Updated:

Ghatkopar Accident : मुंबईत पुन्हा एकदा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, घाटकोपर परिसरात भरधाव टेम्पोने 5 ते 6 पादऱ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरच्या चिराग नगरमध्ये (Ghatkopar Accident) टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने 5-6 पादचाऱ्यांना चिरडलं. या अपघातामध्ये 35  वर्षीय प्रीती पटेल नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. तर रेश्मा शेख (23), मारुफा शेख (27), तोफा उजहर शेख (38), आणि मोहरम अली अब्दूल रहीम शेख (28) हे जखमी झाले आहे. सध्या जखमींवर राजवाडी रुग्णालयात सुरु असून या प्रकरणात पोलिसांनी टेम्पो चालक उत्तम बबन खरात याला ताब्यात घेतला आहे.

आमदार सुरेश धस भान ठेवा, बिनबुडाचे आरोप करू नका, धनंजय मुंडे समर्थकाचा इशारा

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्लामध्ये झालेल्या बेस्ट बस अपघातात 10 हुन अधिक जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. तर आता घाटकोपर भागात पुन्हा एकदा अपघात झाल्याने रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कुर्ला बस अपघात प्रकरण! मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

follow us

संबंधित बातम्या