पराभवाच्या भीतीने भाजपने रामाला मैदानात उतरवलं; घाटकोपरमधील बॅनरबाजीवरून राऊतांचे टीकास्त्र

पराभवाच्या भीतीने भाजपने रामाला मैदानात उतरवलं; घाटकोपरमधील बॅनरबाजीवरून राऊतांचे टीकास्त्र

Sanjay Raut On BJP : आज मुंबईतील सहा मतदारसंघासह राज्यातील 13 मतदारसंघात मतदान सुरू आहे. ऐन मतदानाच्या (Lok Sabha elections) धामधुमीत घाटकोपरमध्ये प्रभू श्रीरामाचे बॅनर लागलेले दिसत आहे. यावरून खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपवर (BJP) टीका केली. पराभवाच्या भीतीने भाजपने रामाला मैदानात उतरल्यांचं राऊत म्हणाले.

राज ठाकरेंनी स्वत:च्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर…; संजय राऊतांचा टोला 

संजय राऊतांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, पराभवाच्या भीतीने भाजपने रामाला मैदानात उतरवलं आहे. रावणही हिंदुत्ववादी होता. रावणाने देखील विरोधकांना तुरंगात टाकलं होतं. रावणाने देवांना बंदीवान केलेलं, तरीही रावणाचा पराभव झाला. राम मैदानात उतरला, रावणाचा पराभव करण्यासाठी, रावण, कंस कोण? हे सांगण्याची गरज नाही, अशी टीका राऊतांनी केली.

Jr NTR Birthday: बॅक टू बॅक सुपरहिट चित्रपट देऊन मोठा स्टार, काय आहे ती गोष्ट? 

आज भाजपकडून काही दैनिकांना आधी मतदान आणि नंतर चहापान ही जाहीरात देण्यात आली. या महायुतीच्या जाहिरातीवरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. आधी मतदान आणि मग पाकीटाचे चहापान. म्हणजे, त्यांचे पाकीटं तयार आहे, असं राऊत म्हणाले. मात्र, महाराष्ट्रातील जनता हुशार असून, अशा कोणत्याही फसवणुकीला किंवा पाकिटाच्या आमिषाला ते बळी पडणार नसल्याचं राऊत म्हणाले.

दरम्यान, आम्हाला पराभवाची अजिबात भीती नाही. भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३५ पेक्षा जास्त जागा जिंकताना तुम्ही पाहाल. ज्यांना पराभवाची भीती वाटते ते पैशाचा आणि यंत्रणेचा दुरुपयोग करतायेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

राज ठाकरे चोरीच्या मालाचे चुंबन घेत
उद्धव ठाकरे पंजाला तर राज ठाकरे धनुष्यबाणाला मत देतील याविषयी विचारले असता राऊत म्हणाले, राज ठाकरे चोरीच्या मालाचे चुंबन घेत आहेत. डुप्लिकेट धनुष्यबाणाला राज ठाकरे मतदान करत आहेत. तो बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण नाही. आम्ही पंजाला मत देतो, हा पंजा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आहे. ज्या काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यात सर्वात जास्त योगदान दिले आहे. ज्या कमलाबाईंना आम्ही 25 वर्षे मतदान केले, त्यांनी देशाची वाट लावली, त्यांनी महाराष्ट्र लूटला. त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आलो. तुम्हाला काँग्रेसचे अनेक नेते मशाली आणि तुताऱ्यावर मतदान करताना दिसतील, असेही संजय राऊत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज