Ghatkopar Hoarding Collapse CM Shinde Order for Audit of Hordings in Mumbai : सोमवारी अचानक आलेल्या पावसाने मुंबईला जोरदार तडाखा दिला. त्यामध्ये अक्षरशः आभाळ कोसळलं आणि मुंबई हादरली. त्यात वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याने ( Ghatkopar Hoarding Collapse ) घडलेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 74 लोकांना वाचविण्यात आले आहे. यातून सरकारने धडा घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे ( CM Shinde) यांनी मुंबईतील सर्व होर्डिंग्जच्या ऑडिटचे ( Audit of Hoardings) आदेश दिले आहेत.
400 पार सोडाच भाजप 250 च्या आतच! योगेंद्र यादवांचा मोठा दावा….
या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की, या घटनेबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील सर्व होर्डिंग्जचे विशेष ऑडिट करून त्यातील परवानाधारक किंवा विना परवाना उभारण्यात आलेल्या होर्डिंग पाडण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारच्या धोकादायक तसेच विनापरवाना होर्डिंग्ज मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. असेही शिंदे यांनी सांगितलं.
4 जूननंतर शेअर बाजारात येणार तेजी! अमित शहांचं मोठं भाकीत, जाणून घ्या विश्लेषकांचं मत
दरम्यान या दुर्घटनेप्रकरणी शहरातील पंतनगर पोलीस ठाण्यात जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मालकीच्या जागेत हा अनधिकृत होर्डिंग लावण्यात आला होता. या परिसरात आणखीही काही ठिकाणी अनधिकृत होर्डिंग आहेत त्यावर महापालिकेने कारवाईस सुरुवात केली आहे.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जखमींचा उपचाराचा खर्च सरकार देणार आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे. या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडूनही अधिक तपास करण्यात येत आहे.