Girish Mahajan : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. पण कार्यकर्त्यांचा आतातायीपणा आहे. असा आततायीपणा भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही करू नये. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, आगामी 2024 मधील आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढवू असं आमच्या वरिष्ठांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने बॅनर लावून संभ्रम निर्माण करू नये. अशी प्रतिक्रिया ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी आयोजित केलेल्या जी-2 युवा संवाद कार्यक्रमात बोलत होते. ( Girish Mahajan Activists too hurry Eknath Shinde is our CM on Ajit Pawar CM Banner)
केसीआर यांचा महाराष्ट्रातील सहकारात शिरकाव; माजी आमदारासह BRS ला मिळाला पहिला साखर कारखाना
दरम्यान मागील एक वर्षापासून राज्याच्या राजकारणात अविश्वसनीय वाटणाऱ्या घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर वर्षभरानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड घडवून आणले. सरकारमध्ये एन्ट्री घेत उपमु्ख्यमंत्रीही बनले. आता तर त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाच खासदार संजय राऊत यांनीही अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील असे म्हटले होते. आज अजित पवार यांचा वाढदिवस आहे. कार्यकर्त्यांनी अजितदादांचे भावी मु्ख्यमंत्री म्हणून फलक लावले आहेत.
त्याचबरोबर अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनीही असेच एक ट्विट केले आहे. मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओला त्यांनी ‘मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…! लवकरच #अजितपर्व’ असे कॅप्शन दिले आहे.
त्यानंतर मिटकरींच्या या ट्विटला शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलं. शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ट्विट करत अमोल मिटकरींना दमानं घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “अहो, मिटकरी दमानं, सरकार काम करतंय जोमानं, बंद करा मिटकरी, मिठाचा खडा की टाकनं. सरकार करतंय काम भारी, ट्रिपलइंजिनची शक्ती न्यारी, विकासकामांना गती खरी, तुम्ही बंद करा टांग आडवनं, मिटकरी दमानं.” अशी कविता सादर करत नरेश म्हस्केंनी मिटकरींना सुनावले आहे.