Lahiru Thirimanne Retires: सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत, लाहिरू थिरिमानेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

  • Written By: Published:
Lahiru Thirimanne Retires: सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत, लाहिरू थिरिमानेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

Lahiru Thirimanne Retired : श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू लाहिरू थिरिमाने याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याने चाहत्यांना ही माहिती दिली. थिरिमाने बराच काळ संघाबाहेर होता. मार्च 2022 मध्ये तो श्रीलंकेसाठी शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो बाहेर होता. थिरिमानेने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4 शतके आणि कसोटीत 3 शतके झळकावली आहेत. त्याने गोलंदाजीतही हात आजमावला आहे. थिरिमाने यांनी त्यांच्या निवृत्तीसंदर्भात एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.( Lahiru Thirimanne Retired From International Cricket Sri Lanka Cricketer Career Record)

थिरिमानेने इंस्टाग्रामवर लिहिले की, “देशासाठी खेळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. गेल्या 13 वर्षांत मला मिळालेल्या सुंदर आठवणींसाठी धन्यवाद. माझ्या प्रवासादरम्यान तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. आता आपण पुढच्या स्टॉपवर भेटू.” थिरिमानेची ही पोस्ट इंस्टाग्रामवर अनेकांनी लाईक केली. यावरही विविध प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

इंटिमेट सीन अन् भगवद्गीता वाचन, Oppenheimer वादात; निर्मात्यांसह सेन्सॉरवर प्रेक्षक भडकले

महत्त्वाचे म्हणजे थिरिमाने श्रीलंकेसाठी 44 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान 2088 धावा केल्या. त्याने कसोटीत 3 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. थिरिमानेची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या नाबाद 155 आहे. त्याने 127 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3194 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 4 शतके आणि 21 अर्धशतके केली आहेत. त्याची वनडे सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 139 आहे. त्याने 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 291 धावा केल्या आहेत. थिरिमानेने प्रथम श्रेणी सामन्यांमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्याने 23 शतकांसह 8799 धावा केल्या आहेत. त्याने लिस्ट ए च्या 233 सामन्यात 6007 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 7 शतके आणि 43 अर्धशतके केली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube