Download App

शिंदे गटाच्या नेत्याचं मंत्रिमंडळावर मोठं विधान; गृहखात्याबद्दलही सांगितली आतली गोष्ट

आता मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात शिवसेना (शिंदे) नेते तथा माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे.

  • Written By: Last Updated:

Maharashtra Cabinet Expansion : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष हे मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागलं आहे. सरकार स्थापन होऊन जवळपास एक आठवडा होत आला. (Cabinet Expansion) मात्र, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहखात्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. परंतु, भाजप गृहखात शिवसेनेला देण्यास तयार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे विस्तार लांबल्याची चर्चा आहे.

हिवाळी अधिवेशापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार, महायुतीत गृहमंत्री पदावरून रस्सीखेच? रावसाहेब दानवेंनी केलं स्पष्ट

आता मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात शिवसेना (शिंदे) नेते तथा माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे? याचं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे. तसंच, ‘आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह अद्यापही सोडलेला नाही’, असं मोठं विधान गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलं. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा अद्यापही कायम असल्याची चर्चा रंगली आहे.

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात आम्ही सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. तसंच, जेव्हा महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसतील तेव्हा ठरवतील. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र, तीन पक्ष असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी वेळ लागत आहे. आता शिवसेनेला किती खाते मिळतील? हे देखील आम्हाला माहिती नाही. याचा अर्थ असा आहे की आम्ही सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. आमच्या पक्षाला किती मंत्रि‍पदे घ्यावी? हे सर्व एकनाथ शिंदे ठरवतील असं गुलाबराव पाटील म्हणालेत.

शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याकडून अशी कोणतेही वक्तव्य नाही की आम्हाला एवढे खाते मिळतील? किंवा आम्हाला हे मंत्रिपद मिळेल. याचा अर्थ हा आहे की आमच्यामध्ये एक वाक्यता आहे. तसंच एकनाथ शिंदे यांना गृहखातं मिळावं, यासाठी सर्वच आमदारांनी आग्रह केला होता. तसंच आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह अद्यापही सोडलेला नाही. आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह जरी धरलेला असला तरी यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार हा एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे, असंही ते म्हणालेत.

follow us