Download App

नगरकरांनो सावध रहा, पुढील 3 दिवस जिल्ह्यात धो धो पाऊस, अलर्ट जारी

IMD Alert : पुन्हा एकदा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. जिल्ह्यातील काही भागात 9 ते 12 ऑक्टोबर

  • Written By: Last Updated:

IMD Alert : पुन्हा एकदा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. जिल्ह्यातील काही भागात 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान वीजांच्‍या कडकडाटांसह हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्‍टी झाल्‍यास जिल्‍ह्यातील भिमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्‍या विसर्गामुळे नद्यांच्‍या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भिमा, घोड, गोदावरी, प्रवरा आणि मुळा या नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तसेच नागरिकांनी पावसाच्या वेळी किंवा विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडावर उभे राहू नये आणि विजेपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी राहावा असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. याच बरोबर धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असं देखील जिल्ह्या प्रशासनाने म्हटले आहे.

याचबरोबर मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत, दिव्‍यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्‍सफॉर्मजवळ थांबू नये आणि सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणाऱ्या लोंबणाऱ्या केबल्‍सपासून दूर रहावे असं देखील जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केला आहे.

जरांगेंविरोधात पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाईफेक; ऑन कॅमेरा मागायला लावली माफी

मुसळधार पावसामुळे होर्डिंग्‍ज् कोसळण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पावसाच्या वेळी कोणीही होर्डिंग्‍ज्च्या आजूबाजूला थांबू नये आणि नागरिकांनी प्रशासनाद्वारे दिलेल्‍या सुचनांचे पालन करावे असं देखील जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आला आहे.

Nikshay Poshan Yojana : क्षयरुग्णांना दिलासा, मिळणार दरमहा 1000 रुपये, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

follow us