पुण्यासह ‘या’ ९ जिल्ह्यांत मुसळधार बरसणार; वाचा हवामान विभागाचा अंदाज

पुण्यासह ‘या’ ९ जिल्ह्यांत मुसळधार बरसणार; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain Update : देशभरातून मान्सूनच्या माघारीला सुरुवात (Maharashtra Rain) झाली आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे. ऑक्टोबर महिन्यातील कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. आता या कडाक्याच्या उन्हात राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर (Weather Update) वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD Rain Alert) आजपासून पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. आजही हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात आज दिवसभर मुसळधार! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात सध्या मान्सूनचा (Monsoon) परतीचा प्रवास सुरू झाला आहे. शनिवारी नंदूरबार जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागातून पावसाने माघार घेतली. अशीच परिस्थिती राहिली तर साधारण १० ऑक्टोबरपर्यंत मान्सून संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या या माघारीच्या प्रवासातही अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर राहिल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात पुणे आणि मुंबईत जोरदार पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली होती. त्यामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. नागरी वस्तीत पाणी जमा झाले होते. पुण्याच्या जवळील पिंपरी चिंचवड शहरालाही पावसाने झोडपून काढले. मुंबईत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं. अंधेरी सबवेवर दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. मुलुंड आणि विक्रोळी पट्ट्यात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. फास्टट्रॅकवर वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू होती. तर विक्रोळी ते भांडुप परिसरात ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.

राज्यात पावसाचे कमबॅक! आज ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; हवामान विभागाचा अंदाज

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube