जरांगेंविरोधात पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाईफेक; ऑन कॅमेरा मागायला लावली माफी

जरांगेंविरोधात पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाईफेक; ऑन कॅमेरा मागायला लावली माफी

Manoj Jarange Patil : मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर त्यांच्या क्लिनिकमध्ये घुसून शाईफेक करण्यात आली असल्याची घटना समोर आली आहे.

माहितीनुसार, संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून मनोज जरांगे विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरच्या अंगावर शाई टाकून निषेध नोंदवण्यात आलाय. मनोज जरांगे यांचे सगेसोयरे मुसलमान असल्याची पोस्ट डॉक्टरकडून करण्यात आली होती असं सांगण्यात येत आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नाशिकच्या सिडको भागातील डॉ. विजय गवळी यांच्या क्लिनिकमध्ये घुसून संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) त्यांच्यावर शाई ओतून निषेध नोंदवला तसेच ऑन कॅमेरा माफी देखील मागायला लावली असल्याची माहिती मिळाली आहे.

तसेच जेव्हा जरांगे पाटील यांच्यावर अंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज झाला होता तेव्हा तुम्ही त्याचा निषेध नोंदवला का? आणि निषेध नोंदवल्याचा काही पुरावा असेल तर दाखवा असा सवाल देखील यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. विजय गवळी यांना सवाल विचारला.

तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील नारायण गडावर दसरा मेळावा घेणार आहे. या मेळाव्यात ते काय म्हणणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. या मेळाव्याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे.

Nikshay Poshan Yojana : क्षयरुग्णांना दिलासा, मिळणार दरमहा 1000 रुपये, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

तसेच जर राज्य सरकारने विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ठीक नाही तर भाजपचे आमदार आम्ही पडणार असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यावर सरकारकडून काम सुरु आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube